Giorgia Meloni बनल्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान; महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं घेतली शपथ

इटलीची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या दिशेनं जात असताना मेलोनी देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत.
Italy PM Giorgia Meloni
Italy PM Giorgia Meloniesakal
Summary

इटलीची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या दिशेनं जात असताना मेलोनी देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत.

Giorgia Meloni : जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी त्यांच्या कॅबिनेट टीमसह इटलीच्या (Italy) पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दुसऱ्या महायुद्धानंतर एका उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. रोममधील क्विरिनाले पॅलेस इथं झालेल्या समारंभात मेलोनी यांना इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जियो मॅटारेला (Italian President Sergio Mattarella) यांनी शपथ दिली.

इटलीची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या दिशेनं जात असताना मेलोनी देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. मेलोनी यांनी गेल्या महिन्यात माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी (Silvio Berlusconi) यांच्या नेतृत्वाखालील फोर्झा इटालिया आणि माटेओ साल्विनी यांच्या स्थलांतरित विरोधी लीगचा समावेश असलेल्या युतीचा भाग म्हणून निवडणूक जिंकली.

Italy PM Giorgia Meloni
Britain : पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

मेलोनी यांच्या सरकारनं युरोपियन सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख मारियो ड्रॅगी (Mario Draghi) यांनी चालवलेल्या राष्ट्रीय एकता प्रशासनाची जागा घेतली. दरम्यान, अनेक दिवसांच्या तणावपूर्ण चर्चेनंतर मेलोनी यांनी आपल्या टीमला ही माहिती दिली. लीग आणि फोर्झा इटालियाला प्रत्येकी पाच मंत्रालये आणि नऊ कॅबिनेट पदं त्यांच्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. टेक्नोक्रॅटमध्ये फक्त सहा महिला आहेत, त्यांचं सरासरी वय 60 आहे. निवडणूक जिंकल्यानंतर मेलोनी यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलंय की, इटालियन लोकांनी आमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि आम्ही कधी त्यांना निराश करणार नाही. देशाची प्रतिष्ठा आणि अभिमान पुनर्संचयित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं हे आमचं काम असेल, असं त्यांनी नमूद केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com