पाकिस्तानची विनवणी : आम्हाला शांततेची एक संधी द्या

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर भारताने सर्वच बाजूने पाकिस्तानची कोंडी केली आहे. नुकतेच राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण त्यांनी करुन दिली. पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मी इम्रान खान यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणालो होतो की आपण आतापर्यंत खूप लढलो. आता आपण गरिबी आणि निरक्षरतेविरुद्ध लढले पाहिजे. तेव्हा ते म्हणाले होते, की मोदीजी मी पठाणचा मुलगा आहे. कधी खोटे बोलत नाही. आज तेच शब्द इम्रान खान यांनी सत्यात उतरविले पाहिजे.

इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर भारताने सर्वच बाजूने पाकिस्तानची कोंडी केली आहे. नुकतेच राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण त्यांनी करुन दिली. पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मी इम्रान खान यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणालो होतो की आपण आतापर्यंत खूप लढलो. आता आपण गरिबी आणि निरक्षरतेविरुद्ध लढले पाहिजे. तेव्हा ते म्हणाले होते, की मोदीजी मी पठाणचा मुलगा आहे. कधी खोटे बोलत नाही. आज तेच शब्द इम्रान खान यांनी सत्यात उतरविले पाहिजे. या भाषणानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. 

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्याचे ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु. पंतप्रधान मोदींनी शांततेची एक संधी द्यावी असे त्यामध्ये म्हटले आहे.

दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगात एकमत आहे. पुलवामा कटाच्या सूत्रधारांना सोडणार नाही. यावेळी सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल. हा बदलेला भारत असून, दहशतवादामुळे ज्या वेदना होत आहे त्या अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला कसे चिरडायचे ते आम्हाला चांगले कळते असे मोदी यावेळी म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give peace a chance: Imran Khan to PM Modi