
वॉशिंग्टन : इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंध आणण्यासाठी त्यांच्याशी करार करण्याचा प्रयत्न करत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर तरी इराणने आमच्याशी करार करण्यासाठी तयार व्हावे, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे. तसेच, करार करण्याची मी इराणला संधी दिली होती, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.