Memorandum of Understanding signed at the Global Impact Forum
sakal
दावोस/पुणे - राज्यातील बायोपॉलिमर नवोपक्रम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महत्त्वपूर्ण करार झाले. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या दृष्टीने स्काय i (आय) या कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या माध्यमातून कंपनी राज्यात सुमारे ५३९ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.