आइन्स्टाइन, गॅलिलिओ अन्‌ हॉकिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

खुर्चीवर खिळून राहिलेली स्टीफन हॉकिंग यांची छबी संपूर्ण जगभरात कौतुकाचा आणि आदराचा विषय होती. असंख्य युवकांना प्रेरणा देणाऱ्या, कृष्णविवरांसारख्या किचकट विषयामध्ये संशोधन करणाऱ्या हॉकिंग यांचा जन्म आणि मृत्यू या दोन्हींमध्ये विज्ञानविश्‍वाचा अनोखा योगायोग आहे. आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर ३०० वर्षांनी हॉकिंग यांचा जन्म झाला आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या १३९व्या जयंती दिवशी हॉकिंग यांचे निधन झाले. 

विश्‍वातील गूढ वाटणाऱ्या गोष्टींची उकल करण्यासाठी हॉकिंग यांनी आयुष्यभर संशोधन केले. ॲस्ट्रॉफिजिक्‍ससारख्या (खगोलभौतिकी) एरवी सर्वसामान्यांना रुक्ष वाटणाऱ्या विषयात काम करत असूनही विद्वत्ता आणि हजरजबाबीपणा यामुळे हॉकिंग यांचे चाहते जगाच्या सर्व भागांत आणि सर्व थरांमध्ये आहेत. अनेकदा लोकप्रियतेमध्ये त्यांची तुलना सर आयझॅक न्यूटन आणि आइन्स्टाइन यांच्याशी होत असे. वयाच्या विशीत जडलेल्या एका व्याधीने हॉकिंग यांना आयुष्यभर व्हीलचेअरला खिळून बसावे लागले. तरीही कृष्णविवरांचे गूढ उकलण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संशोधन केले. 

‘रोज मृत्यूच्या छायेत असूनही ४९ वर्षे मी जगलो आहे. मी मृत्यूला घाबरत नाही; पण मला मरणाची घाईही नाही. या जगातून निघून जाण्यापूर्वी मला अनेक कामं करायची आहेत,’ असे हॉकिंग यांनी २०११ मध्ये ‘गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news stephen hawking dies galileo-galilei albert einstein