स्टीफन हॉकिंग यांचा जीवनपट

गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव विमानात घेताना.
गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव विमानात घेताना.

वयाच्या एकविसाव्या वर्षी ओढवलेल्या दुर्धर आजारावर खंबीरपणे मात करून खगोल-भौतिकशास्त्रात मोलाची भर घालणारे, अवकाशाकडे बघण्याची सामान्यांची दृष्टी बदलणारे या शतकातील महत्त्वाचे वलयांकित संशोधक स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनप्रवासाविषयी...

1942 - जन्म - ८ जानेवारी १९४२, ऑक्‍सफर्ड, इंग्लंड. फ्रॅंक आणि इसोबेल हॉकिंग या दांपत्याचे स्टीफन हे पहिले अपत्य. 

1953 - सेंट अल्बान्स स्कूलमध्येच त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाळेत असताना ते सर्वसाधारण विद्यार्थीच होते, तरी त्यांचे मित्र त्यांना ‘आइनस्टाइन’ म्हणत! 

1959 - ऑक्‍सफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकण्यास सुरवात. इतरांच्या तुलनेत कमी वयाचे असल्याने सुरवातीचे दीड वर्ष अवघड गेले.ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली. खरे तर त्यांना गणित विषयात शिक्षण घ्यायचे होते; पण कॉलेजमध्ये तो विषय नसल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय निवडला.  

1962 - ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी केंब्रिजच्या ट्रिनिटी हॉलमध्ये संशोधनास सुरवात केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना मोटार न्यूरॉनचा आजार झाल्याचे निदान झाले. त्या वेळी डॉक्‍टरांनी त्यांच्याकडे दोन वर्षांचेच आयुष्य शिल्लक असल्याचे सांगितले होते. 

1963 - जेनी विल्डेची भेट. तिला त्यांची विनोदी शैली आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आवडले.

1964 - जेनीने लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांना नैराश्‍यातून बाहेर येण्यास व संशोधनाकडे वळण्यास त्याची मदत झाली.
  
1965 - १४ जून रोजी स्टीफन आणि जेनी यांचा विवाह.

1966 - ‘प्रॉपर्टीज ऑफ एक्‍स्पाडिंग युनिव्हर्सेस’ हा प्रबंध सादर करून पीएचडी मिळवली. 

1969 - तब्येत खालावल्यामुळे व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.

1970 - ‘सेकंड लॉ ऑफ ब्लॅक होल डायनॅमिक्‍स’ म्हणून ओळखला जाणारा सिद्धांत मांडला.

1974 - कृष्णविवरातून एकप्रकारचे किरण उत्सर्जित होत असतात, हे त्यांनी दाखवून दिले. या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली.

1978 - ऑक्‍सफर्ड विद्यापीठाकडून मानद डॉक्‍टरेट बहाल. 

1979 - केंब्रिजला परतून ल्युकेशियन प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्‍स पदावर रुजू.

1085 - न्यूमोनिया झाल्यामुळे श्‍वसनास त्रास. ट्रॅकियोटॉमीमुळे आवाज गेला. त्यांच्यासाठी डोके आणि डोळ्यांच्या हालचालीवर चालणारा स्पीच सिंथेसायझिंग प्रोग्रॅम तयार करण्यात आला.

1990 - स्टीफन आणि जेनी विभक्त.

1995 - नर्स म्हणून काम करणाऱ्या इलेन मेसन हिच्याशी विवाहबद्ध.

2005 - शारीरिक स्थिती आणखी खराब. संवादासाठी गालावरच्या स्नायूंचा वापर सुरू.

2006 - दुसरी पत्नी इलेन हिच्याशी घटस्फोट.

2007 - मुलगी ल्युसी आणि हॉकिंग यांनी मिळून लहान मुलांसाठी ‘जॉर्जज सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ हे पुस्तक प्रकाशित केले. 

2007 - शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या विमानात आठ वेळा वजनविरहित स्थितीचा अनुभव.

2009 - आरोग्यविषयक समस्या अधिकच वाढल्या. स्वतः व्हीलचेअर चालवणे अशक्‍य झाले. श्‍वसनाचा त्रास बळावला. 

2009 - अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित. 

2010 - त्यांच्या मौलिक संशोधनावर आधारित ‘द ग्रॅंड डिझाइन’ पुस्तकाचे प्रकाशन. यात जगाची निर्मिती देवाने केली या संकल्पनेला विरोध.

हे माहीत आहे?
 एलियन्सशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांना हॉकिंग यांचा ठाम विरोध आहे. यातून अधिक आक्रमक आणि धोकादायक एलियन्सशी संबंध येऊ शकतो, अशी भीती त्यांना होती.
 पृथ्वीवरून मनुष्य नामशेष होण्यामागे स्वत: माणूसच कारणीभूत ठरेल, यावर त्यांचा विश्‍वास होता.
 हॉकिंग यांनी शोधलेले आणि ‘हॉकिंग रेडिएशन’ नावाने ओळखले जाणारे कण कृष्णविवरातूनही बाहेर पडू शकतात.
आजारपणाने घेरण्याआधी ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या रोईंगच्या संघात हॉकिंग यांचा समावेश होता. 
 एकीकडे संशोधनाला वाहून घेतलेले असताना हॉकिंग यांच्यातील विनोदबुद्धीही कायम होती. ‘द सिम्पसन्स’ आणि ‘स्टार ट्रेक’सारख्या कार्यक्रमांमध्येही त्यांनी हजेरी लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com