Google: 12000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर सुंदर पिचाई स्वतः बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

गुगलचा कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का
Google
Google

देशभरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच अनेक कंपन्यांनी हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या यादीत गुगलचेदेखील नाव आहे. काही दिवसांपूर्वी, गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. त्यानंतर आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. (Google CEO Sundar Pichai may take a pay cut executive bonuses to be cut)

टाऊन हॉल येथे झालेल्या मिटिंगमध्ये पिचाई यांनी बोलताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का बसणार आहे.

T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

काय म्हणाले पिचाई?

वरिष्ठ पदावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात करण्यात येणार आहे. सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुगलने फक्त वार्षिक बोनसमध्ये कपातीची घोषणा केली आहे. मासिक पगारातील वेतनाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

वरिष्ठांच्या बोनस कपातीची टक्केवारी किती असेल आणि किती काळ तशीच राहिल याविषयी सुंदर पिचाई यांनी काही सांगितले नाही.

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर 20 जानेवारीला गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. 'गुगलला 25 वर्षे झाली आहे. परंतु, सध्या गुगल कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. ' असे गुगलने म्हटले आहे.

Google
Google VS CCI : गुगलला सरकारचे ऐकावे लागणार, आता भारतात अँड्रॉइडमध्ये अनेक मोठे बदल होणार

कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वी पिचाई यांना मोठी वेतनवाढ मिळाली होती. Google ची मूळ कंपनी अल्फाबेटकडून ही वाढ मिळाली होती. 2020 च्या एका रिपोर्टनुसार, पिचाई यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 2 मिलिअन डॉलर आहे. IFL हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 रिपोर्टनुसार, सुंदर पिचाई यांच्या नेटवर्थमध्ये 20 टक्क्यांनी खाली असून सध्या त्यांची नेटवर्थ 5,300 कोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com