गुगलने तयार केले छळविरोधी ‘टूल’

पत्रकार, कार्यकर्ते व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींच्‍या मदतीसाठी गुगलने छळविरोधी साधन तयार केले
Google developed anti harassment tool Washington
Google developed anti harassment tool Washingtone sakal

वॉशिंग्टन : पत्रकार, कार्यकर्ते व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींच्‍या मदतीसाठी गुगलने छळविरोधी साधन तयार केले आहे. या साधनाला ‘हरॅसमेंट मॅनेजमेंट’ असे नाव देण्यात आले आहे. ‘द व्हर्ज’ या अमेरिकेच्या तंत्रज्ञानविषयक संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार गुगलच्या जिग्सॉ विभागाने या मुक्त स्त्रोत छळपविरोधी साधनाचा कोड प्रसिद्ध केला आहे.

जिग्सॉ सध्या ट्विटर एपीआयबरोबर काम करीत आहे. व्यापक प्रमाणात गाळणी करुन आणि अहवाल प्रणालीद्वारे ट्विटवरील उत्तरे लपविणे, अकाउंट ब्लॉक किंवा बंद करणे अशी कार्यवाही केली जाते. अपमानास्पद संदेश डाउनलोड करण्याची सोय यात वापरकर्त्याला दिली आहे. यातून किंवा थेट धमकी, कायदा व सुव्यवस्थेबाबत बेकायदा मजकूर असेल तर त्याविरोधात कागदोपत्री पुरावे तयार होऊ शकतात. जागतिक महिला दिनानिमित्त या साधनाचे उद्‍घाटन गुगलने मंगळवारी केले. स्त्री-पुरूष भेदभावाला सामोरे जावे लागणाऱ्या महिला पत्रकारांसाठी हे साधन उपयुक्त आहे. ट्विटरवर सक्रीय असलेल्या पत्रकारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांना ऑनलाइन छळाला सामोरे जावे लागते, अशा सर्वांना त्याचा वापर करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com