esakal | पॉर्न पाहताय? मग तुमच्यासाठी आहे 'हा' धोका
sakal

बोलून बातमी शोधा

पॉर्न पाहताय? मग तुमच्यासाठी आहे 'हा' धोका

तुम्ही मोबाईलवर incognito ब्राऊजरमधून जरी पॉर्न बघत असला तरी तुमची माहिती फेसबुक आणि गुगलकडे जात आहे. मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसेल्व्हानिया आणि कार्नेगी मेलॉनने संशोधन केलं. यातून ही गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा धोका आहे.

पॉर्न पाहताय? मग तुमच्यासाठी आहे 'हा' धोका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क :  तुम्ही मोबाईलवर incognito ब्राऊजरमधून जरी पॉर्न बघत असला तरी तुमची माहिती फेसबुक आणि गुगलकडे जात आहे. मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसेल्व्हानिया आणि कार्नेगी मेलॉनने संशोधन केलं. यातून ही गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा धोका आहे.

संशोधनामध्ये जगभरात प्रौढांसाठी असलेल्या 22 हजार 484 वेबसाइट स्कॅन करण्यात आल्या. यामध्ये सर्व युजर्सचा डेटा इतरांना पाठवला जात असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये जवळपास 93 टक्के वेबसाइट थर्ड पार्टी अॅप कंपन्यांना त्यांच्या युजर्सची माहिती शेअर करतात. केवळ, 17 टक्के वेबसाइटवर इन्क्रिप्शन फिचर आहे. तर उरलेल्या 93 टक्के वेबसाइटमधील 74 टक्के पॉर्न साइटला गुगल आणि इतर कंपन्यांकडून ट्रॅक केलं जात होतं. सॉफ्टवेअर कंपनी ऑरकेलसुद्धा 24 टक्के पॉर्न साइटला ट्रॅक करत असल्याचं समोर आलं आहे. तर फेसबुक 10 साइटमागे एक या प्रमाणात ट्रॅक करते.

संशोधकांनी जरी दावा केला असला तरी याबाबत गुगल आणि फेसबुकने मात्र पॉर्न साइट पाहणाऱ्यांचा डेटा ट्रॅक करत असल्याचं फेटाळून लावलं आहे. गुगलने म्हटलं की, आम्ही प्रौढांसाठी असलेल्या साइटवर जाहिरात दाखवण्याच्या विरोधात आहे. तर फेसबुकने आपण अशा प्रकारच्या साइटला ट्रॅक करत नसल्याचं म्हटलं आहे.

loading image