esakal | भारत सरकार नळाद्वारे पाण्यासाठी इस्राईलची घेणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Water-Supply

स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलजीवन अभियाना’अंतर्गत सर्व घरांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे जाहीर करत यासाठी ३.५ लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले होते. जलस्रोतांचे संवर्धन, विकास आणि व्यवस्थापन करण्यास केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, अशी माहिती इस्राईलमधील भारताचे नवे राजदूत संजीव सिंगला यांनी सांगितले.

भारत सरकार नळाद्वारे पाण्यासाठी इस्राईलची घेणार मदत

sakal_logo
By
पीटीआय

तेल अविव - देशातील प्रत्येक घराला २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा देण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी भारत सरकार इस्राईलकडे मदत मागणार आहे.

स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलजीवन अभियाना’अंतर्गत सर्व घरांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे जाहीर करत यासाठी ३.५ लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले होते. जलस्रोतांचे संवर्धन, विकास आणि व्यवस्थापन करण्यास केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, अशी माहिती इस्राईलमधील भारताचे नवे राजदूत संजीव सिंगला यांनी सांगितले. पुढील आठवड्यात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे याचसाठी इस्राईलला जात असून दोन्ही देश जलसंवर्धनातील सहकार्य वाढविण्यावर भर देणार असल्याचे सिंगला म्हणाले. 

पाण्याचा पुनर्वापर हा इस्राईलमधील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. या देशातील ८० टक्के सांडपाण्याचा फेरवापर केला जातो. शेखावत हे १७ ते १९ नोव्हेंबरला इस्राईलला जात आहेत.

loading image