esakal | अरर्र...आता अशीही केस कापण्याची नवी स्टाईल; तुम्ही ही म्हणाल आपल्यालासुद्धा हाच न्हावी हवा
sakal

बोलून बातमी शोधा

Hairstylist Barber.

okसध्या बदलत्या फॅशन शैलीमध्ये लहान मुलंसुद्धा न्हावीकडे न जात सलूनमध्ये जाऊन केस कापण्यासाठी प्राधान्य देत आहे. अर्थातच आपल्याला त्याच हेअरस्टायलिस्टनेच केलेली स्टाईल, हेअरकटिंग आवडलेली असते. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर अशाच एका हेअर स्टाइलिस्टचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

अरर्र...आता अशीही केस कापण्याची नवी स्टाईल; तुम्ही ही म्हणाल आपल्यालासुद्धा हाच न्हावी हवा

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत की पूर्वी केस कापण्यासाठी घरोघरी न्हावी यायचे, नाहीतर एखाद्या झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये किंवा एखादा कोपरा धरून बसलेले असायचे. त्यांच्याकडे केस कापून घेण्यासाठी वाट पाहावी लागायची. कारण त्या काळात सलून नसायचे ना. म्हणून त्या लोकांना खूप मागणी होती. परंतु सध्या याचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे. अनेक ठिकाणी बोटावर मोजण्याइतके न्हावी आता पाहावयास मिळत आहेत. सध्या बदलत्या फॅशन शैलीमध्ये लहान मुलंसुद्धा न्हावीकडे न जात सलूनमध्ये जाऊन केस कापण्यासाठी प्राधान्य देत आहे. 

प्रत्येक घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाचं एखादं सलून ठरलेलं असेलच बरोबर ना. कारण आपले केसांची स्टाईल आणि त्या हेअरस्टायलिस्टनेच केस कापलेले अनेकांना आवडतात म्हणून त्याच सलूनमध्ये जाण्यास प्राधान्य देतात. अर्थातच आपल्याला त्याच हेअरस्टायलिस्टनेच केलेली स्टाईल, हेअरकटिंग आवडलेली असते. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर अशाच एका हेअर स्टाइलिस्टचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

  
केस कापण्याच्या हटके स्टाइलसाठी हेअरस्टायलिस्ट बार्बर हे खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या याच खास कलेमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे नेहमीच सर्वच हेअरकट मस्त असतात. परंतु सध्या त्याने केलेला हेअरकट आणि हेअरकटचा त्याचा हा अनोखा अंदाच अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. 
 
या  व्हिडीओमध्ये हेअरस्टायलिस्ट बार्बर एका ग्राहकाचे केस कापत आहे आणि पुन्हा एकदा त्या केसांना प्रत्येक अँगलने पाहत आहे. कारण केस कापताना कुठेही काही कमी तर राहिली नाही ना. म्हणेजच बार्बर हे सर्व जवळून पाहून ते पाहून तो पुन्हा त्याच्या सलूनपासून काही अंतरावर दूर असलेल्या झाडाजवळ जाऊनदेखील ग्राहकाचे केस तपासत आहे. आपल्याकडून केस कापताना काही राहून तर गेलं नाही ना हेच तो पाहत आहे. 

हा व्हिडीओ एका ट्विटर युझरने शेअर केला होता. आतापर्यंत त्या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहे. तसेच एक लाखापेक्षा अधिक युझर्सनी रिट्वीट केलं आहे. खूपच हटके स्टाईल ने केस कापले जात असल्यामुळे हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.