भारतीय मुस्लिम यंदाही हज यात्रेला मुकणार

haj yatra
haj yatra

नवी दिल्ली- हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय मुस्लिमांचा यावर्षीही हिरमुस होणार आहे. कारण सौदी अरबियाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतासह इतर देशांच्या यात्रेला परवानगी नाकारली आहे. पण, स्थानिक 60 हजार लोकांना हज यात्रेसाठी परवानगी असणार आहे. सौदी सरकारच्या सौदी प्रेस एजेन्सीने यासंबंधिची माहिती दिली आहे. हज यात्रा जूलै महिन्यात सुरु होणार आहे. यात 18 ते 65 वर्य वयांचे लोक भाग घेऊ शकतील. हज यात्रेला कुराणमध्ये खूप पवित्र मानण्यात आलं आहे. जे लोक शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्टीने सक्षम आहेत. त्यांनी आयुष्यात किमान एकदा तरी हज यात्रा करावी असं म्हटलं जातं. (haj yatra saudi arabia announces new guidelines indians not allowed)

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदीने इतर देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भारतीय मुस्लिमांना हज यात्रेसाठी जाता येणार नाही. स्थानिक 60 हजार लोक हजसाठी येऊ शकतील, पण त्यांचे लसीकरण अनिवार्य असेल. हजला येणाऱ्यांचे आरोग्य आणि देशाची सुरक्षा लक्ष्यात घेता सखोल विचारानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सौदी सरकारने म्हटलं. दरवर्षी जवळपास 20 लाख यात्री हज यात्रेसाठी जात असतात. मागील वर्षी केवळ 1 हजार लोकांना हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली होती.

haj yatra
लसीकरण रोखण्याची चाल उघड!

हज यात्रेत काय होतं?

हज यात्रेदरम्यान मुस्लिम सफा आणि मरवा नावाच्या दोन डोंगरादरम्यान सात फेऱ्या मारतात. या डोंगराच्यादरम्यानच पैगंबर इब्राहीम यांच्या पत्तीने आपल्या मुलासाठी पाणी शोधलं होतं असं म्हणतात. मक्कापासून पाच किलोमीटर दूर मिनामध्ये सर्व हज यात्री एकत्र नमाज पढतात. पुढच्या दिवशी अरफात नामी पोहोचून मैदानात नमाज पढण केले जाते. येथून परतल्यानंतर सर्व मुस्लीम थैतानाला दगडं मारण्याची परंपरा पार पाडतात. याचा अर्थ अल्लाहच्या मार्गात त्याचे अनुयायी कधीही शैतानाला येऊ देत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com