esakal | हरभजन सिंहने शेयर केली 'मॉडर्न थाळी'; मोबाईलची जागाही प्लेटमध्ये दिसली, तो म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh

हरभजन सिंहने ट्विटरवर 'मॉडर्न थाळीचा फोटो पोस्ट केला आहे. त्या थाळीमध्ये त्या वस्तूला दाखवले गेले आहे, जे आजच्या युगात महत्वाचे साधन आहे. जर ही गोष्ट नसेल तर प्लेट अपूर्ण दिसते.

हरभजन सिंहने शेयर केली 'मॉडर्न थाळी'; मोबाईलची जागाही प्लेटमध्ये दिसली, तो म्हणाला...

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : इंडिया टीमचा खेळाडू हरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव राहतो आणि मजेदार पोस्ट शेअर करून चाहत्यांचे इंटरटेन करत असतो. यावेळी हरभजनने इतक मजेदार पोस्ट केलं आहे की हे पाहून, लोक कमेंट्स पास करत आहेत. हरभजन सिंहने ट्विटर वर 'मॉडर्न थाळी चा फोटो पोस्ट केला आहे. त्या थाळीमध्ये त्या वस्तूंना दाखवले गेले आहे, जे आजच्या युगात वापरण्यात येणारे आहे. जर ही गोष्ट नसेल तर प्लेट अपूर्ण दिसते.

आपल्या भोजनच्या प्लेटलाच थाळी असे म्हणले जाते. रेस्टॉरंट्स आणि घरांमध्येसुद्धा थाळीवरच भोजन दिलं जातं. म्हणूनच, व्हेज-थाली आणि नॉन- व्हेज थाळी हॉटेलमध्ये प्रसिद्ध आहेत. पण आज भारतात प्लेटमध्ये एक महत्वाची गोष्ट दिसत आहे. तुम्हाला वाटतं असेल कि प्लेटमध्ये भात ठेवण्यात येत आहे. हे सांगत आहे. परंतु आम्ही भाताबद्दल बोलत नाही. आम्ही सध्या सर्वांच्या हातात असेलल्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत.

हरभजनने ट्विटरवर एक मजेदार फोटो शेअर केला आहे. जिथे स्टील प्लेटमध्ये स्मार्टफोन ठेवण्यासाठीही जागा आहे. म्हणजेच कुणीही जेवण करताना प्लेटमध्ये मोबाइल ठेवून आरामात जेवण करू शकेल. 

यावेळी हरभजन सिंगने फोटो कॅप्शन शेअर केले आहे. 'मॉडर्न थाळी' मध्ये मोबाइलसाठीही जागा आहे, 'ऑर्डर तुमची'. त्याने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. 10 सप्टेंबरला त्यांनी हे पोस्ट शेअर केली. आतापर्यंत दहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 500 हून अधिक री-ट्वीट आणि शेकडो कमेंट्स आलेल्या आहेत. लोकांना हा फोटो खूपच मजेशीर वाटत आहे.

एका युजरने लिहिले की, 'सध्याच्या जगाच्या वास्तविक समस्येवर हा सर्वोत्तम उपाय आहे. दुसर्‍या युजरने लिहिले, 'हे प्लेट माझ्यासाठी योग्य आहे.' असे एक ना अनेकजणांना ही सिस्टीम आवडलेली दिसून येत आहे.