
केंब्रिज : ट्रम्प प्रशासनाने निधी रोखल्यामुळे चर्चेत आलेल्या जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. उच्च शिक्षणात जागतिक पातळीवर वरच्या क्रमांकावर असलेल्या या विद्यापीठाला ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांमुळे धोका निर्माण झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर आज या विद्यापीठाचे कामकाज सुरू झाले.