Hassan Al Kontar : सात महिने त्याचं घर होतं एअरपोर्ट, अखेर त्याला कॅनडानं दिलं नागरिकत्व

सिरियाचा हा व्यक्ती देशहीनच असता जर त्याला कॅनडाने नागरिकत्व दिलं नसतं.
Hassan Al Kontar
Hassan Al Kontaresakal

Hassan Al Kontar : कुठल्याही व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावाप्रमाणे त्याच्या नागरिकत्वावरदेखील अवलंबून असते. आपण भारतीय आहोत हे मोठ्या गर्वाने सांगतो. कारण आपल्याला भारताचं नागरिकत्व प्राप्त झालंय. मात्र या व्यक्तीस तब्बल सात महिने एअरपोर्टवर गेस्ट म्हणून राहावं लागलं. त्याला स्वत:चा देश नव्हता. सिरियाचा हा व्यक्ती देशहीनच असता जर त्याला कॅनडाने नागरिकत्व दिलं नसतं.

सात महिने एअरपोर्टवरच राहिला

हसन अल-कोंतर असे या व्यक्तीचे नाव. सीरियन निर्वासित हसनला मलेशियाच्या विमानतळावर सात महिने राहावे लागले. अल जझीराच्या रिपोर्टनुसार, सीरियातून पळून गेल्यानंतर तो क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. त्याच्याकडे इमिग्रेशनची कागदपत्रे नव्हती आणि त्यामुळे तो इतर कोणत्याही देशात जाऊ शकत नव्हता.

बुधवारी हसनने प्रथमच कॅनडाचे राष्ट्रगीत गायले. इन्स्टाग्रामवर जगाला आनंदाची बातमी देताना हसनने सांगितले की, त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले आहे. हसनला यासाठी अनेक बलिदान द्यावे लागले. हसनने सांगितले की त्याने त्याचे वडील गमावले, त्याचे घरही गमावले. त्याला तुरुंगात जावे लागले. हसनचे घर युद्धामुळे उद्ध्वस्त झाले आहे आणि त्याने एका दशकापेक्षा जास्त काळ आपल्या प्रियजनांना पाहिले नाहीये. (Passport)

विमानतळावर असा अडकला होता हसन

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 2017 मध्ये हसन संयुक्त अरब अमिरातीहून मलेशियाला पोहोचला. सीरियात युद्ध सुरू झाल्यामुळे तो सीरियात जाऊ शकला नाही. सीरियन (Syria) नागरिकांना व्हिसाशिवाय ९० दिवस मलेशियामध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. 90 दिवसांनंतर हसनने इक्वेडोर आणि नंतर कंबोडियाला जाण्याचा प्रयत्न केला. कंबोडियन अधिकाऱ्यांनी हसनचा पासपोर्ट जप्त केला आणि त्याला परत मलेशियाला पाठवले.

हसनला कोणताही देश प्रवेश देत नव्हता आणि त्याला विमानतळावरच थांबावे लागले. क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तो स्वत:बद्दल ट्विट करायचा, व्हिडिओ शेअर करायचा. जगभरातील लोकांनी हसनबद्दल सहानुभूती दर्शवली आणि कॅनडातील तीन लोकांनी त्याला मदतीचा हात पुढे केला.

मेहरान करीमी नसेरी हे पॅरिस विमानतळावर १८ वर्षे वास्तव्यास होते. 'द टर्मिनल' हा चित्रपटही त्यांच्या जीवनावर बनला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये मेहरान यांचे निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com