Heavy Rainfall : ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाचा कहर, भुस्खलनात 100 जणांचा बळी

Heavy Rainfall Brazil
Heavy Rainfall Brazilesakal
Summary

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं ब्राझीलमधील परिस्थिती बिकट होत चाललीय.

पाऊस आणि भूस्खलनामुळं ब्राझीलमधील (Heavy Rainfall Brazil) परिस्थिती बिकट होत चाललीय. मुसळधार पावसामुळं दररोज अनेकांचा मृत्यू होत आहे. सध्या तिथं मृतांची एकूण संख्या 100 झालीय. राज्याची राजधानी रेसिफे (Recife Brazil) आणि त्याच्या महानगर भागात कार्यरत असलेल्या बचाव पथकानं मंगळवारी ही माहिती दिलीय.

वृत्तानुसार, आतापर्यंत 14 लोक बेपत्ता आहेत. 6,000 हून अधिक रहिवाशांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय. राष्ट्रपती जैर बोल्सोनारो (President Jair Bolsonaro) यांनी पीडितांच्या बचावासाठी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी संघांची घोषणा केल्यानंतर, मंत्री बोल्सोनारो यांनी पावसानं प्रभावित क्षेत्राला भेट दिली. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी सोमवारी जाहीर केलंय की, 'सरकार बाधित क्षेत्रांच्या पुनर्बांधणीसाठी 1 अब्ज डॉलरची (US 210 डॉलर) मदत करेल.'

Heavy Rainfall Brazil
पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डात खळबळ; 'सिलेक्टर'नं दिला राजीनामा

बोल्सोनारो यांनी रिओ दी जनेरियो (Rio de Janeiro), दक्षिणेकडील बाहिया राज्य आणि मिनस गेराइस राज्याच्या वरच्या पर्वतांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची परिस्थिती ओढावलीय. गेल्या वर्षभरात पूर आणि अतिवृष्टीमुळं या भागात शेकडो लोकांचा बळी गेलाय. तर हजारो लोकांना घराबाहेर पडावं लागलंय. बोल्सोनारो पुढं म्हणाले, 'आम्ही दु:खी आहोत. कुटुंबातील सदस्यांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो. कुटुंबांचं सांत्वन करणं आणि भौतिक साधनांसह लोकसंख्येची काळजी घेणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे.'

Heavy Rainfall Brazil
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत : शिवराज सिंह चौहान

मुसळधार पावसामुळं घरातून बेघर झालेल्या लोकांना रेसिफे शहरात असलेल्या शाळांमध्ये सामावून घेतलं जात आहे. त्याच वेळी, अलागोस राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळं बाधित 33 नगरपालिकांमध्ये आणीबाणीची घोषणा केलीय. दरम्यान, दक्षिण मेक्सिकोमध्ये अगाथा चक्रीवादळामुळं निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण अद्याप बेपत्ता आहेत. दक्षिणेकडील ओक्साका शहराच्या गव्हर्नरनं ही माहिती दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com