येथे सीझेरियनने जन्मातात बाळे.... 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

सीझेरियन पद्धतीने म्हणजे सामान्यांच्या भाषेत चिरफाड करून केलेली प्रसूती आता सर्रास केली जाते. या पद्धतीचा वापर पहिल्यांदा रोमन साम्राज्यात केला गेला. रोमन सम्राट ज्यूलिअस सीझरच्या जन्मावेळी प्रथमच जिवंत महिलेचे पोट फाडून बाळाला बाहेर काढण्यात आले होते.

न्यूयॉर्क : गर्भवतीची प्रसूती सामान्य होणे हे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगले असते. सामान्य प्रसूतीसाठी पूर्वी डॉक्‍टरही प्रयत्न करीत असत. काही अपवादात्मक स्थितीतच प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) करण्याचा कल असे. मात्र आता सीझरने मूल जन्मला घालण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे. 

सीझरने प्रसूती करण्याची कारणे, सीझर करण्याचे प्रमाण जगात कोठे जास्त व कमी आहे याचा आढावा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ-हू) घेतला आहे. यासाठी 137 देशांमधील आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. यात संघटनेच्या मानकांनानुसार केवळ 14 देशात सीझरचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. युक्रेन, नामीबिया, ग्वाटेमाला व सौदी अरेबिया या देशांचा समावेश होतो. अन्य ठिकाणी शस्त्रक्रियेने प्रसूती करण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आहे. 

"डब्ल्यूओ'नुसार सीझरची कारणे 
- बाळ व आईच्या जिवाला धोका असल्यास 
- केवळ 10 ते 15 टक्के घटनांमध्येच परवानगी 

गरीब देशांतील स्थिती 
- गरीब देशांत सीझेरियनची संख्या कमी 
- इथोपिया, बुर्किना फासो, मादागास्कर या देशांत 100 दोन मुलांचा जन्म सीझेरियनने 

श्रीमंत देशांचा कल 
-उलट युरोप, आशिया, अमेरिकेत प्रत्येक चौथे मूल सीझेरियनने जगात येते 
- जर्मनीत एक तृतीयांश घटनांमध्ये सीझेरियन केले जाते 

सीझरवर जोर 
- ब्राझील, तुर्कस्थान, इजिप्तमध्ये प्रत्येक दुसरी प्रसूती सीझेरियनने होते 
-केवळ 20 टक्के गर्भवतींची प्रसूती सामान्य होते 

भारतातील प्रसूती 
-सामान्य प्रसूतीचे प्रमाण चांगले 
- सीझेरियनचे एकूण प्रमाण 18 टक्के 

दिल्ली बदनाम 
- दिल्लीत खासगी रुग्णालयात 65 टक्‍के मुले सीझेरियनने जन्माला येतात. 
- महिलांचा सीझरसाठी आग्रह. बहुतांश वेळा डॉक्‍टर भाग पाडतात 

डॉक्‍टरांची कारणे 
- बाळाच्या गळ्याला नाळेचा फास 
- पोटातील पाणी कमी होणे 
- आई व बाळाला संसर्ग, कावीळ होणे 

सीझेरियनमागे आर्थिक गणित 
सामान्य प्रसूतीसाठी जास्त वेळ लागतो. तर सीझेरियन करून प्रसूती करण्यास तुलनेने कमी कालावधी लागतो. यामुळे आर्थिक फायद्यासाठी कमी वेळेत जास्त प्रसूती करण्याकडे अनेक डॉक्‍टरांचा कल असतो. 

प्रशिक्षणाची उणीव 
काही देशांमध्ये संसर्गाच्या भीतीने डॉक्‍टर प्रसूती वेदना सुरू होण्यासाठी औषधे देतात. मात्र अशा औषधांमुळे प्रसूती सामान्य होऊ शकत नाही आणि सीझेरियनचा धोका निर्माण होतो. एकदा सीझेरियनने प्रसूती झाली की दुसऱ्यांदाही सीझरच करावे, लागते असा चुकीचा समज आहे. पहिल्या प्रसूतीनंतर दोन वर्षांत शरीरात पुन्हा ताकद निर्माण होते. त्यामुळे दुसरी प्रसूती सामान्य होऊ शकते. मात्र डॉक्‍टर पुन्हा सीझर करण्याचाच सल्ला देतात. 

धोकादायक सीझेरियन 
सीझेरियन म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आहे. यात ओटीपोटाला छेद देऊन मूल बाहेर काढले जाते. अशा पद्धतीने प्रसूती झाल्यावर शरीर पूर्ववत होण्यास व ताकद भरून येण्यास अनेक महिने लागतात. मात्र अनेकदा काही डॉक्‍टर आर्थिक फायद्यासाठी रुग्णाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. 

ज्युलिअस सीझरचे नाव 

सीझेरियन पद्धतीने म्हणजे सामान्यांच्या भाषेत चिरफाड करून केलेली प्रसूती आता सर्रास केली जाते. या पद्धतीचा वापर पहिल्यांदा रोमन साम्राज्यात केला गेला. रोमन सम्राट ज्यूलिअस सीझरच्या जन्मावेळी प्रथमच जिवंत महिलेचे पोट फाडून बाळाला बाहेर काढण्यात आले होते.

सीझरच्या नावावरून अशा प्रकारच्या प्रसूतीला सीझेरियन असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. तर या शस्त्रक्रियेमध्ये कात्रीचा म्हणजे "सीझर'चा वापर करून प्रसूती केली जाते म्हणूनही याला सीझेरियन म्हटले जाते, असाही एक समज आहे. 

सीझेरियनचे प्रमाण (आकडे टक्‍क्‍यांत) 

इथोपिया, बुर्किना फासो, मादागास्कर 

50 
ब्राझील, इजिप्त, तुर्कस्थान 

18 
भारत 

65 
दिल्ली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Here are the children born by Caesarean