esakal | ड्रगनला कोरोनाचा फटका, दुसऱ्या तिमाहीत GDP मध्ये घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रगनला कोरोनाचा फटका, दुसऱ्या तिमाहीत GDP मध्ये घसरण

ड्रगनला कोरोनाचा फटका, दुसऱ्या तिमाहीत GDP मध्ये घसरण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

China Growth Rate : आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये चीन देशाच्या जीडीपीमध्ये (‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ) घसरण पाहायला मिळाली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहिती चीनच्या जीडीपीमध्ये घसरण झाली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चीनचा जीडीपी घसरल्याचं आर्थिक तज्ज्ञांनी सांगितलं. कोरोनाच्या विळख्यातही पहिल्या तिमाहीत चीनचा जीडीपी चांगला होता.

नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (एनबीएस) च्या आकड्यानुसार, चीनच्या दुसऱ्या तिमाहीचा जीडीपी 7.9% टक्के इतका आहे. गुंतवणूकीच्या आधारावर अंदाज बांधलेल्य 8.1% पेक्षा कमी आहे. पहिल्या तिमाहीमधील (जानेवारी ते मार्च) जीडीपीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीमध्ये 18.3 टक्केंनी घसरण पाहायला मिळाली.

हेही वाचा: ‘महिंद्रा’ची नवीन 7 सीटर ‘बोलेरो निओ’ लाँच, जाणून घ्या सर्वकाही

जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. यामुळे उद्योग आणि व्यावसाय पूर्णपणे ठप्प झाले होते. परिणामी प्रत्येक देशाची आर्थिक प्रगती संथ झाली होती. अशा परिस्थितीत जानेवारी 2021 च्या पहिल्या तिमाहीतही चीनचा जीडीपी वाढला होता. कोरोना काळात जीडीपीमध्ये सुधार असणारा चीन एकमेव देश होता. मात्र, दुसऱ्या तिमाहीत चीनच्या जीडीपीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

loading image