अबुधाबीमध्येही आता 'हिंदी' अधिकृत!

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीमध्ये आता हिंदी ही अधिकृत भाषा असेल. अबुधाबी कोर्टाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असून अरबी व इंग्रजी भाषेनंतर आता हिंदी ही भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरता येईल.

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीमध्ये आता हिंदी ही अधिकृत भाषा असेल. अबुधाबी कोर्टाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असून अरबी व इंग्रजी भाषेनंतर आता हिंदी ही भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरता येईल. अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेतल्याचे अबुधाबीच्या न्यायविभागाने सांगितले.

अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांचे प्रमाण जास्त आहे. लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हिंदी भाषेचा समावेश करणे गरजेचे होते. अबुधाबीच्या न्याय विभागाने सांगितले की, नोकरीच्या प्रकरणांमध्ये हिंदी भाषेचा अरबी व इंग्रजीनंतर वापर करण्यात येईल. हिंदी भाषेचा समावेश न्यायालयासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी केला जाईल. खटल्याची प्रक्रिया, अधिकार, कर्तव्य याबाबत माहिती हिंदी भाषिकांना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्याय विभागाने सांगितले. 

युएईमध्ये परदेशी नागरिकांची सर्वाधिक असते. भारतीयांची संख्या 26 लाखाच्या आसपास आहे. हिंदी भाषेचा समावेश करण्याबरोबरच अबुधाबीच्या न्यायिक विभागात अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. न्याय विभागाचे अंडर सेक्रेटरी युसूफ सईद अल आबरी यांनी सांगितले की, आम्ही आमची न्यायप्रक्रिया पारदर्शी करूत आहेत, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi is now official Language in Abudhabi