‘हिंद-प्रशांत’साठी ‘क्वाड’ची एकजूट

समान आव्हानांचा एकत्रपणे मुकाबला करणार
‘हिंद-प्रशांत’साठी ‘क्वाड’ची एकजूट
‘हिंद-प्रशांत’साठी ‘क्वाड’ची एकजूटsakal

वॉशिंग्टन : जगाबरोबरच हिंद- प्रशांत भागातील शांतता आणि स्थैर्यासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार ‘क्वाड’ संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. ‘क्वाड’चे सदस्य असणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांनी समान आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नव्या उपाययोजना आखण्याची घोषणा करतानाच चीनशी दोन हात करण्याचा इशारा दिला आहे.

पंतप्रधान मोदी हे त्यांच्या छोटेखानी भाषणात म्हणाले की, ‘‘जगाच्या कल्याणाची एक मोठी शक्ती म्हणून क्वाड संघटना काम करेल. या संघटनेचे सदस्य असणाऱ्या चारही बड्या लोकशाही देशांतील सहकार्य हे हिंद- प्रशांतबरोबरच भारतामध्येही स्थैर्य आणू शकेल. हे चारही सदस्य देश हे सर्वप्रथम २००४ मध्ये हिंद- प्रशांतच्या हितासाठी एकत्र आले होते. आज कोरोनाचे संकट निर्माण झाले असताना मानवतेच्या हितासाठी आपण एकत्रितपणे काम करत आहोत. क्वाडच्या सदस्यांनी राबविलेल्या लसीकरण मोहिमेमुळे हिंद-प्रशांतमधील देशांना मोठी मदत झाली आहे. ’’ व्हाइट हाउसच्या ईस्ट रूममध्ये क्वाड देशांच्या नेत्यांचे हे संमेलन पार पडले. संमेलनाचे आयोजक अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना बोलण्याची संधी दिली. याआधीही दोन्ही नेत्यांची बैठक पार पाडली.

‘हिंद-प्रशांत’साठी ‘क्वाड’ची एकजूट
बाळापूर : अफूची बोंडे, डोडा पावडरची विक्री

दहशवादी कारवायांचा निषेध

दक्षिण आशियात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा आज क्वाडकडून निषेध करण्यात आला. यावेळी सगळ्यांचाच रोख हा पाकिस्तानच्या दिशेने होता. कोणत्याही स्थितीमध्ये दहशतवाद्यांची पाठराखण केली जाऊ नये अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. क्वाडचे सदस्य देशांकडून एक संयुक्त निवदेन प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात अफगाणिस्तानबाबतच्या राजनैतिक, आर्थिक आणि मानवी हक्कविषयक धोरणांबाबत समन्वय ठेवून काम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देण्याचेही या देशांनी जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपची घोषणा

बायडेन म्हणाले की,‘‘ कोरोना ते वैश्‍विक तापमानवाढ आदी समान आव्हानांचा सामना करण्यासाठी हे चारही लोकशाहीप्रधान देश एकत्र आले असून या सगळ्यांचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक आहे. एका सकारात्मक अजेंड्यावर मोकळ्या वातावरणात खुलेपणाने चर्चा करण्याचे ठरले होते. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो आहे की आपण या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत.’’ यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे सुगा हे देखील उपस्थित होते. बायडेन यांनी क्वाडच्या सदस्य देशांतील विद्यार्थ्यांसाठी नव्या फेलोशिपचीही घोषणा केली.

हिंद- प्रशांतचा भाग जोर जबरदस्ती आणि वादांपासून मुक्त असावा. आता जे वाद सुरू आहेत ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत सोडविण्यात यावेत. आमचा मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांतवर विश्‍वास आहे.

- स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान ऑस्ट्रेलिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com