
एका हिंदू मंदिरात भाविकांवर झालेल्या हल्ल्यावरून कॅनडात प्रचंड गदारोळ सुरू आहे. कॅनडाच्या ब्रॅम्पटनमध्ये हिंदू सभा मंदिरातील भाविकांवर खलिस्तानवाद्यांच्या हल्ल्यानंतर मोठ्या संख्येने सोमवारी भारतीय वंशाचे लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. खलिस्तान्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू सभा मंदिराच्या बाहेर हजारो भारतीय- कॅनेडियन लोकांनी एकत्र येत मोर्चा काढला. उत्तर अमेरिकेतील हिंदू संघटना (CoHNA) कडून आयोजित या मोर्चाचा उद्देश खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराविरोधात एकता दाखवून देणे हा होता.