अमेरिकी निर्बंधांची फिकीर नाही - केरी

वृत्तसंस्था
Wednesday, 19 August 2020

वैयक्तिक पातळीवर मला काही अडचणींना सामोरे जावे लागेल, पण त्यामुळे मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही. अमेरिकी उद्योगांनी हाँगकाँगला चालना द्यावी म्हणून प्रयत्न सुरू राहतील.Carrie Lam

हाँगकाँग - अमेरिकेने निर्बंध लादले म्हणून फार फिकीर वाटत नसल्याचे हाँगकाँगच्या मुख्य कार्यवाह केरी लॅम यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले. चीनने हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यामुळे अमेरिकेने केरी यांच्यासह हाँगकाँगच्या काही आजी-माजी अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याविषयी केरी म्हणाल्या की, वैयक्तिक पातळीवर मला काही अडचणींना सामोरे जावे लागेल, पण त्यामुळे मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही. चीनसाठी तसेच हाँगकाँगसाठी जे योग्य आहे ते आम्ही करीत राहू. अमेरिकी उद्योगांनी हाँगकाँगला चालना द्यावी म्हणून प्रयत्न सुरू राहतील.

दरम्यान, हाँगकाँगमध्ये उत्पादन झालेल्या मालाबाबत अमेरिकेने नवी अट लागू केली आहे. त्यानुसार या वस्तूंवर मेड इन चायना असा शिक्का मारावा असे अमेरिकेने बंधनकारक केले आहे. याविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे टीका करू असेही केरी यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hong Kong Chief Executive Carrie Lam

Tags
टॉपिकस
Topic Tags: