राष्ट्रगीत, वादग्रस्त विधेयक अन् चीनच्या संसदेतील दादागिरी!

hong kong, China, chinese national anthem
hong kong, China, chinese national anthem

हॉगकॉग : जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चिंताजनक वातावरण असताना चीनमध्ये राष्ट्रगीताच्या मुद्यावरुन वाद सुरु आहेत. हॉगकॉग विधानपरिषदेत याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. चीनच्या राष्ट्रगीतासंदर्भातील विधेयक विधानपरिषदेत मंजूर करुन घेण्यासाठी विरोधकांना संसदेबाहेर ठेवण्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रगीतासंदर्भातील विधेयक मंजूर झाल्यानंतर चीनी राष्ट्रगीताचा अवमान करणे हा गुन्हा ठरणार आहे. या विधेयकाला काही नेत्यांचा विरोध आहे. मात्र विरोधकांचा आवाज दाबून टाकत विधेयक मंजूर करण्याची खटाटोप चीनमध्ये सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.    

हॉगकॉगच्या विधान परिषदेच्या कामकाजला सुरुवात होताच वादाला सुरुवात झाली. चीनमधील हॉगकॉग विधान परिषदेत प्रस्तावित विधेयकासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे  हाउस कमिटीला आहेत. प्रस्तावासंदर्भातील कामकाजाच्या अधिकारासह प्रस्तावावरील मतदान कधी घ्यायचे याचा अधिकारही याच कमिटीकडे आहे. हॉगकॉगमध्ये बीजिंग समर्थक नेत्यांचा दबदबा वाढत आहे. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या अध्यक्षांनी नव्या नेत्यांची निवड करण्यासाठी बीजिंग समर्थक नेता आणि सदस्य चान किन-पोर यांची नियुक्ती केली होती. सोमवारी विधान परिषदेची कामकाज सुरु करण्यापूर्वी चान अध्यक्षाच्या आसनावर विराजमान झाले होते. त्यांच्या भोवती  20 पेक्षा अधिक सुरक्षा रक्षकांचे कवच होते.  

कामकाजात सहभागी होण्यासाठी लोकशाही दलाच्या समर्थकांना संसदेत येण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. जेव्हा या नेत्यांनी विरोध केला तेव्हा त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. वादग्रस्त विधेयक मंजूर करण्यासाठी विरोधकांना संसदेतून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काहींना किरकोळ दुखापतही झाल्याचे समजते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com