हाँगकाँग पोलिसांकडून नव्वद आंदोलकांना अटक 

वृत्तसंस्था
Monday, 7 September 2020

गेल्या वर्षी जूनपासून जवळपास प्रत्येक आठवड्याअखेर निदर्शने होत आहेत. प्रस्तावित प्रत्यार्पण कायदा, नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करणे अशा घडामोडींनंतर निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 

हाँगकाँग - विधीमंडळाची निवडणूक कोरोनाच्या नावाखाली वर्षभर लांबणीवर टाकण्याच्या आल्याच्या निषेधार्थ हाँगकाँगमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने झाली. याप्रकरणी पोलिसांनी किमान 90 जणांना अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही निवडणूक रविवारीच होणार होती, पण 31 जुलै रोजीच लांबणीवर टाकण्याचा आदेश मुख्य कार्यवाह केरी लॅम यांनी जारी केला होता. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण त्यांनी पुढे केले असले तरी लोकशाहीवादी समर्थकांना जास्त जागा मिळण्याच्या शक्यतेमुळे सरकार चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळेच ही चाल करण्यात आल्याचे टीकाकारांचे मत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या वर्षी जूनपासून जवळपास प्रत्येक आठवड्याअखेर निदर्शने होत आहेत. प्रस्तावित प्रत्यार्पण कायदा, नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करणे अशा घडामोडींनंतर निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 

कॉलूनमधील याऊ मा तेई येथे हल्ला व स्वातंत्र्यवादी घोषणा दिल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक झाली. नव्या सुरक्षा कायद्यानुसार अशा घोषणा बेकायदा असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यकर्ता अटकेत 
मला माझा मतदानाचा अधिकार हवा आहे, अशी मागणी लेऊंग क्वोक-हुंग या कार्यकर्त्याने केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hong Kong police arrest ninety protesters