होर्मुझच्या सामुद्रधुनीत मृत्यूचा सापळा! भारतीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला आग, क्षेपणास्त्र हल्ल्याने खळबळ

Hormuz Strait Attack, Indian Crew Rescue, Iran US Tensions : होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या जहाजाला आग, क्षेपणास्त्र हल्ला आणि तेलवाहू जहाजे अडवल्याने सागरी मार्गावरील तणाव वाढला.
Indian crew members rescued after a tanker fire and missile attack in the strategically important Hormuz Strait amid escalating Iran-US maritime tensions

Indian crew members rescued after a tanker fire and missile attack in the strategically important Hormuz Strait amid escalating Iran-US maritime tensions

esakal

Updated on: 

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवरही दिसू लागला आहे. या महत्त्वाच्या जलमार्गावर जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, शुक्रवारी एमटी लुझ १ (MT Luz 1) या टँकरच्या इंजिनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या जहाजात भारतीय कर्मचारी प्रवास करत होते. आगीमुळे टँकरची वाहतूक करण्याची क्षमता संपुष्टात आली. या घटनेनंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, दोन्ही जहाजांवरील एकूण २९ भारतीय कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी दिली.

Loading content, please wait...