esakal | Video: भयानक अपघात; दुचाकीचे तुकडे-तुकडे
sakal

बोलून बातमी शोधा

horror video 200mph crash motogp riders collide austrian gp and flying bikes miss valentino rossi

ऑस्ट्रेलियन ग्रांपी शर्यतीत दुचाकीला अपघात झाला आणि दुचाकींचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. सुदैवाने या अपघातातून दोघे बचावले आहेत. अपघाताचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: भयानक अपघात; दुचाकीचे तुकडे-तुकडे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सीडनीः ऑस्ट्रेलियन ग्रांपी शर्यतीत दुचाकीला अपघात झाला आणि दुचाकींचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. सुदैवाने या अपघातातून दोघे बचावले आहेत. अपघाताचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियन ग्रांपी शर्यतीदरम्यान दुचाकी 200 पेक्षा जास्त वेगाने धावत होत्या. फ्रांसो मोर्बीडेल्ली आणि जोहान झार्को या दोघांची वाहने एका वळणावर एकमेकांच्या जवळ आली आणि अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की, चेंडू हवेत उडावा तसे हवेत उडाले आणि बाजूला फेकले गेले. एक दुचाकी रस्त्याच्या कडेला गेली तर दुसरी दुचाकी चेंडू सारखी टप्पा घेत घेत पुन्हा ट्रॅकवर आली. यामध्ये दोन्ही दुचाकींचे तुकडे-तुकडे झाले. सुदैवाने या अपघातात दोघेही बचावले आहेत. पण, यात नऊ वेळचा वर्ल्ड चॅम्पियन व्हॅलेंटीनो रोसी थोडक्यात वाचला. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. नशीब बलवत्तर म्हणून बचावल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top