Hotel Of Doom In North Korea : 35 वर्षांपासून ओसाड पडलेल्या या हॉटेलच्या बांधकामावर जवळपास 161 अब्ज डॉलर्स उधळण्यात आले होते

दुर्दैवाने तिथे आजवर एकही पाहुणा राहायला आलेला नाही
Hotel Of Doom In North Korea
Hotel Of Doom In North Koreaesakal

Hotel Of Doom In North Korea : दुर्दैवाने तिथे आजवर एकही पाहुणा राहायला आलेला नाही. हे निर्जन हॉटेल उत्तर कोरियामध्ये आहे.जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत, जी पाहून लोक मंत्रमुग्ध होतात. त्याची विशालता बघून लोक आश्चर्यचकित होतात.

साधारणपणे कुठलेही हॉटेल तयार झाले की तिथे लोक यायला लागतात, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात एक असे हॉटेल आहे जे आलिशान आहे आणि पण दुर्दैवाने तिथे आजवर एकही पाहुणा राहायला आलेला नाही. हे निर्जन हॉटेल उत्तर कोरियामध्ये आहे. खरं तर हा देश एक रहस्यमय देश मानला जातो, कारण तेथील बहुतेक गोष्टी उर्वरित जगापर्यंत पोहोचत नाहीत.

Hotel Of Doom In North Korea
Health Care News: तुम्हाला खूप झोप येते का? तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

या हॉटेलला 'हॉटेल ऑफ डूम' असेही म्हणतात. तसे, त्याचे खरे नाव 'द रयुग्योंग हॉटेल' आहे , जे उत्तर कोरियाच्या प्योंगयांगमध्ये आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, हे हॉटेल गेल्या साडेतीन दशकांपासून म्हणजे सुमारे 35 वर्षांपासून पूर्णपणे रिकामे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे निर्जन हॉटेल बनवण्यासाठी 1.6 अब्ज पौंड्स म्हणजेच 161 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत, म्हणजेच इतका पैसा वाया गेला आहे.

Hotel Of Doom In North Korea
Health Care : हिवाळ्यात डिंकाचे सेवन करणे आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या 'हे' फायदे

हॉटेलमध्ये 3000 खोल्या बांधल्या आहेत

330 मीटर उंचीच्या या हॉटेलचे बांधकाम 1987 साली सुरू झाले, ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. नियोजनानुसार काम झाले असते आणि हे हॉटेल 1989 मध्ये सुरू झाले असते तर ते जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून प्रसिद्ध झाले असते, असे सांगितले जाते. या हॉटेलमध्ये सुमारे तीन हजार खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

Hotel Of Doom In North Korea
Dental Health Tips : आता स्माईल करा मोठी; या घरगुती उपायांनी करा दातांवरील किडीची सुट्टी

त्यामुळे बांधकाम थांबलं

वृत्तानुसार, 1992 मध्ये जेव्हा उत्तर कोरिया सोव्हिएत युनियनच्या पतनामुळे आर्थिक संकटात अडकला होता तेव्हा या हॉटेलचे बांधकाम थांबले होते. नंतर 2012 मध्ये हे हॉटेल सुरू होईल असे सांगण्यात आले होते, परंतु नंतर ही तारीख 2013 पर्यंत वाढवण्यात आली. मात्र, हे हॉटेल आजतागायत सुरू झालेले नाही आणि हे हॉटेल कधी सुरू होणार याबाबतही माहिती नाही. यामुळेच हा जगातील सर्वात विचित्र आणि मूर्ख प्रकल्पांपैकी एक मानला जातो, ज्यावर अब्जावधी आणि ट्रिलियन रुपये उधळले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com