esakal | लग्नानंतर समजलं दोघे आहेत बहीण-भाऊ; तरी मोडला नाही संसार, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नानंतर समजलं दोघे आहेत बहीण-भाऊ; तरी मोडला नाही संसार, कारण...

या मुलीला नेमकं सून म्हणावं कि मुलगी असा मोठा पेच कुटुंबियांसमोर होता

लग्नानंतर समजलं दोघे आहेत बहीण-भाऊ; तरी मोडला नाही संसार, कारण...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

लग्नाच्या गडबडीत अनेक भन्नाट किस्से घडत असतात हे साऱ्यांनाच माहित आहे. असे काही मजेशीर व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहेत. यामध्येच सध्या अशाच एका लग्नाची चर्चा रंगली आहे. चीनमधील एका जोडप्याने मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा केला. मात्र, लग्न झाल्यावर हे दोघंही एकमेकांचे बहीण-भाऊ असल्याचं समोर आलं. त्यातच सत्य समोर आल्यानंतरही या दोघांनी लग्न मोडलं नाही. विशेष म्हणजे हे लग्न न मोडण्यामागचं कारणदेखील तितकंच भन्नाट आहे. त्यामुळेच या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

चीनमधील जिआंगसु येथे राहणाऱ्या एका जोडप्याने थाटामाटात लग्न केलं. मात्र, लग्न झाल्यानंतर नववधू आपली बहीण असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. विशेष म्हणजे या नववधूला पाहिल्यानंतर घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. मात्र, सत्य परिस्थिती समोर आल्यानंतरही या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला नाही. 

जिआसंगु येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलगी २० वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. योगायोगाने २० वर्षांनंतर हीच मुलगी त्यांना पुन्हा भेटली. मात्र, त्यावेळी आपली बेपत्ता झालेली मुलगी हीच आहे हे कुटुंबियांना समजलं नाही. त्यामुळे, त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न या मुलीसोबत करुन दिलं. लग्न झाल्यानंतर या मुलाच्या आईने नववधूच्या शरीरावर असलेली एक जन्मखूण पाहिली आणि काही वर्षांपूर्वी आपली हरवलेली मुलगी हीच असल्याचं सत्य समोर आहे. विशेष म्हणजे या खुलाशानंतर या घरातील प्रत्येकाची द्विधा मनस्थिती झाली होती. या मुलीला नेमकं सून म्हणावं कि मुलगी हा मोठा पेच त्यांच्या समोर उभा राहिला होता. मात्र, या घटनेमध्येच आणखी एक सत्य समोर आलं ते म्हणजे ज्या मुलासोबत या मुलीचं लग्न झालं होतं. तो मुलगा दत्तक घेण्यात आला होता. त्यामुळेच हे लग्न मोडण्यात आलं नाही.

लहान असतांना मुलगी हरवल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी एका मुलाला दत्तक घेतलं होतं. याच मुलासोबत तिचं लग्न लावण्यात आलं. विशेष म्हणजे या हरवलेल्या मुलीला अन्य एका कुटुंबाने दत्तक घेतलं होतं. त्यामुळे हे लग्न मोडण्यात आलं नाही. मात्र, २० वर्षानंतर आपल्या खऱ्या आई-वडिलांना पाहिल्यानंतर या मुलीच्या भावनांचा बांध फुटला आणि ती धायमोकलून रडायला लागली. त्यामुळे हा संबंधित प्रकार पाहिल्यानंतर संपूर्ण लग्नातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद,दु:ख असे संमिश्र भाव पाहायला मिळाले.
 

loading image