कोरोनावरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला ब्रिटनमध्ये सुरवात 

Human testing of possible vaccine of coronavirus begins in Britain
Human testing of possible vaccine of coronavirus begins in Britain

लंडन, ता. २५ (वृत्तसंस्था) : कोरोनावरील संभाव्य सलीच्या मानवी चाचणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती लंडन येथील इम्पिरियल महाविद्यालयातर्फे गुरुवारी देण्यात आली आहे. आठवड्याभरात ३०० रुग्णांवर या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

रॉबिन शेटॉक आणि त्यांच्या सहकार्यांनी तयार केलेली या लसीच्या प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्यांनुसार ही सुरक्षित असल्याचे समोर आले असून, यामुळे प्राण्यांमध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे, तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी यापूर्वी संभाव्य लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. जगभरात १२० पेक्षा अधिक संस्था कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कॅथी या ३९ वर्षीय महिलेवर या लसीची पहिली चाचणी करण्यात येणार आहे. 

आयआयटी बॉम्बेचे आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे; शैक्षणिक सत्र ऑनलाइन घेण्याचा...
मला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचे होते. मात्र, मला माहीत नव्हते कशाप्रकारे या लढ्यात सहभागी होता येईल. मात्र, या संभाव्य लसीच्या चाचणीमध्ये सहभागी होत माझी कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होता आले, अशी प्रतिक्रिया कॅथी नावाच्या एका स्वयंसेविकेने दिली आहे. 

H-1Bव्हिसाचा निर्णय ट्रम्प यांच्या पथ्यावर; अमेरिकेत स्थानिकांसाठी लाखो जॉब...
पहिल्या टप्प्यात ३०० जणांवर चाचणी करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये ६००० जणांवर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती इम्पिरियल महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे. २०२१ पर्यंत ही लस ब्रिटनसह परदेशात वितरित केली जाऊ शकते, अशी अपेक्षा लस तयार करणाऱ्या रॉबिन शेटॉक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मोठी बातमी! भारतीय अवकाश क्षेत्र  खासगी कंपन्यांसाठी खुले 
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत 43 हजारांपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतला आहे, तर देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील आठवड्यात ब्रिटनने कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डेक्सामेथोसेन औषध प्रभावी ठरत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या औषधाचा वापर कोरोनाग्रस्तांवर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com