PM Narendra Modi : 'तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या',PM मोदींची लोकप्रियता पाहून राष्ट्राध्यक्ष भारावले

जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले
PM Narendra Modi
PM Narendra Modi

जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्याची लोकप्रियता 78 टक्के इतकी आहे. त्यांची ही लोकप्रियता पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे थेट ऑटोग्राफची मागणी केली आहे. इतकेच नव्हे त्यांनी सर्वांचे मनं जिंकणारे विधानदेखील केलं आहे. (I should take your autograph US President Joe Biden to PM Narendra Modi )

हिरोशिमा या शहरात ही शिखर परिषद होत आहे. या संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना भेटत आहेत. याचवेळी त्यांनी क्वाड संमेलनालाही हजेरी लावली तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथिन अल्बानीज हे देखील उपस्थित होते.

दरम्यान जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. जो बायडन मोदींच्या जवळ आले आणि म्हणाले की, “मी सध्या एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करतोय. तुमची लोकप्रियता अफाट आहे. ही माझ्यासाठी एक समस्या बनली आहे.”

'तुम्ही अमेरिकन लोकांवरही प्रभाव टाकला आहे. तुमची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या, असं बायडन म्हणाले. हिरोशिमामधील या घटनेची सध्या जागतिक पातळीवर चर्चा होताना दिसत आहे.

PM Narendra Modi
G-7 मध्ये मोदींचा डंका! बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, बायडेन पडले मागे
PM Narendra Modi
G-7 Summit : जी-७ परिषद भारताशी जवळीक का वाढवत आहे ? सातत्याने मिळतेय निमंत्रण

तसेच, पुढच्या महिन्यात मी वॉशिंग्टनमध्ये तुमच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी अमेरिकेच्या प्रत्येक शहरातून-गावातून येऊ इच्छित आहे. पण आता त्यासाठीचे माझ्याकडचे पासेस संपले आहेत. तुम्हाला वाटत असेल की मी तुमची चेष्टा करतोय. पण हवं तर माझ्या टीमला विचारा.

मला अशाही लोकांचे फोन येत आहेत, ज्याचं याआधी मी नावही ऐकलेलं नाहीये. कलाकारांपासून ते माझ्या नातेवाईकांपर्यंत लोकांचे मला फोन येत आहेत. त्यांना या पार्टीत यायचं आहे, असं बायडन यांनी मोदींना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com