UN Court : गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना मदत मिळण्यात इस्राईल अडथळे आणत असल्याच्या तक्रारीनंतर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. पॅलेस्टाईनने इस्राईलवर पद्धतशीर हाल आणि वसाहतीच्या हेतूने आक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
हेग (नेदरलँड) : गाझा पट्टीतील नागरिकांना मानवतावादी मदत मिळण्यात इस्राईलकडून येत असलेल्या अडथळ्यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात याबाबतच्या सुनावणीस आजपासून सुरुवात झाली.