धो-धो पाऊस पडतोय? तर मग ऑफिसमधून जाता येणार घरी!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- मुसळधार पाऊस पडल्यास आता ऑफिसमधून जाता येणार घरी.

- कर्मचाऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी उचलण्यात आले पाऊल.

सिडनी : पावसाळा सुरु होताच अनेकांना वेध लागतात ते रोड ट्रिप आणि डोंगरांवर फिरायला जाण्याचे. हिरव्यागार घाटांत गरमागरम भजी आणि चहा घेत पावसाची मजा घेणे म्हणजे पर्वणीच. मात्र, अशा वेळी रोज धोधो पावसात ऑफिसला जाणं किती कंटाळवाणं असतं हे काही वेगळं सांगायला नको. अशातच मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये पाणी तुंबून कर्मचाऱ्यांचे होणारे हाल काही केल्या संपत नाहीत. ऑस्ट्रेलियामध्ये मात्र, सरकारने यावर वेगळी शक्कल लढविली आहे. धोधो पाऊस पडत असल्यास कर्मचाऱ्यांना त्याक्षणी ऑफिसमधून घरी निघता येऊ शकते. 

सध्या ऑस्ट्रेलियातील हवामान अत्यंत खराब असल्याने थंड वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी गारांचा पाऊसह होत आहे. तसेच काही ठिकाणी अचानक हवामानात घट होत आहे. अशा वातावरणाचा सर्वाधिक फटका ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो. 

त्यामुळेच ऑस्ट्रेलियामध्ये कार्यालयीन कामासंबधीत निर्णय घेणाऱ्या न्यायाधिकरणाने धोधो पाऊस सुरु झाल्यास कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून जाण्याची मुभा दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Heavy Raining you may leave from Office