आज आम्ही अफगाणिस्तान सोडले नाही, तर कधी सोडणार? - जो बायडेन

तालिबानवर विश्वास ठेवता? या प्रश्नावर जो बायडेन म्हणाले....
biden from mumbai jo biden connection with india
biden from mumbai jo biden connection with india

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानच्या (Afganistan) परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (America president) जो बायडेन (jo biden) यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. "अफगाणिस्तानून लोकांना बाहेर काढताना, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख आणि वेदना दिसतायत. पण त्याशिवाय दुसरा मार्गही नाहीय. मन हेलावून टाकणारे फोटो समोर येतायत, ते वास्तव आहे. त्या लोकांना पाहून मला सुद्धा दु:ख होत आहे. पण दिवसाच्या शेवटी हाच प्रश्न उरतो की, आज आम्ही अफगाणिस्तान सोडले नाही, तर कधी सोडणार ?" असे जो बायडेन म्हणाले.

"अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढून तिथून निघण्यासाठी अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ठरवली आहे. पण ही मुदत वाढू शकते का? या संदर्भात लष्करासोबत त्यांची चर्चा सुरु आहे. आम्हाला मुदत वाढवावी लागू नये, अशी अपेक्षा आहे. पण चर्चा सुरु आहे" असे जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधून पत्रकारांशी बोलताना सांगितले.

biden from mumbai jo biden connection with india
एकनाथ शिंदे भाजपात जाणार? राणेंच्या वक्तव्यावर मंत्र्याचे उत्तर

"आम्हाला माहित आहे, दहशतवादी परिस्थितीचा फायदा उचलून निष्पाप अफगाणि नागरिक आणि अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतील. पण आम्ही सर्तक असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत" असे बायडेन यांनी सांगितले.

biden from mumbai jo biden connection with india
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या शेतकऱ्याचं निधन

तालिबानवर तुम्ही विश्वास ठेवता का? या प्रश्नावर जो बायडेन म्हणाले की, "मी कोणावरही विश्वास ठेवत नाही. तुमच्यावर सुद्धा नाही. मी तुमच्यावर प्रेम करतो. पण मी विश्वास ठेवतो, अशी जास्त माणस नाहीयत. तालिबानला मुलभूत निर्णय घ्यावा लागेल" १४ ऑगस्टपासून अमेरिकेने लष्करी आणि अन्य विमानांमधून आतापर्यंत ३० हजार ३०० नागरिकांची अफगाणिस्तानातून सुटका केली आहे, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com