सावधान! तुम्ही जर झोमॅटो फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर...

सुस्मिता वडतिले 
Tuesday, 15 September 2020

चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी कंपनीसोबत संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर अमेरिका, ब्रिटन यासोबतच जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे.

पुणे : अनेक दिवसांपासून कोरोना संकटांमुळे आपल्या आजूबाजूला अनेक काही गोष्टी घडत आहेत. त्यातच पूर्व लडाखमध्ये खूप तणावपूर्वक वातावरण सुरू आहे. त्यातच चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी कंपनीसोबत संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर अमेरिका, ब्रिटन यासोबतच जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तानुसार, यामध्ये  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका ते उद्योगपतींचाही यामध्ये समावेश आहे. परंतु आता याचासुद्धा फटका तुम्हालाही बसू शकेल. 

हायब्रीड वॉरफेअर आणि चीनमधील विस्तारासाठी डेटा वापरण्यामध्ये आधी पासून ही कंपनी सर्वोत्कृष्ट मानली जाते. झेन्हुआच्या डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडकडून या लोकांचे रिअल टाईम मॉनिटरींग केले जाते. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवले जात आहे.

ही कंपनी केवळ मोठ्या  लोकांवरच नाही तर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमाटो आणि स्विगी या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरही चीन लक्ष ठेवत आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, उबर इंडियाचे ड्रायव्हर ऑपरेशन्सचे प्रमुख पवन वैश, झोमाटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल आणि स्विगीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन रेड्डी यांच्यावरही चीन नजर ठेवून आहे.

या कॅबिनेट मंत्र्यांवर आहे नजर... 

आपल्या काही कॅबिनेट मंत्र्यांचा रिअल टाईम डेटासुद्धा चीनच्या नजरेमध्ये आहे. यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचाही यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह तीन सैन्यदलांच्या कमीतकमी 15 माजी प्रमुखांचेसुद्धा या यादीमध्ये नाव आलेले आहेत. 

अशी मिळतीय चीनला माहिती...  

एका रिपोर्टनुसार, बिग डेटा टूल्सचा वापर केला असून झेन्हुआच्या या ऑपरेशनशी संबंधित मेटा डेटाची तपासणी केली गेली आहें . त्यानंतर ही माहिती उघडकीस आलेली आहे. यावेळी तपासणीवेळेस भारतीय संस्थांशी संबंधित माहिती मोठ्या लॉग फाईल डंपमधून काढण्यात आली आहे. हा डेटा लीक करणार्‍या कंपनीने त्याला ओव्हरसीझ इन्फॉरमेशन डेटाबेस हे नाव दिले आहे. या डेटाबेसमध्ये एडवान्स लॅंगवेज, टार्गेटिंग आणि क्लासिफिकेशन टूल वापरले आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युएई यांचीही नोंद केली गेलेली आहे.

डेटा चोरी करणारी कंपनी ही 9 सप्टेंबरपासूनच बंद...

माहितीनुसार, www.china-revival.com या वेबसाइटवर त्यांनी दिलेल्या ईमेल आयडीवर एक क्वेरी पाठवण्यात आली होती. परंतु अद्यापही यास काहीच  प्रतिसाद मिळालेला नाही. 9 सप्टेंबरपासूनच या कंपनीने आपली वेबसाइट पॅसिव्ह केलेली आहे. आणखीनसुद्धा ही वेबसाइट उघडली जात नाही आहे.  दिल्लीमधील चिनी दूतावासानी सांगितले, चीन सरकारने कंपनी किंवा व्यक्ती यांना चिनी सरकारच्या बॅकडोर किंवा स्थानिक कायद्यांचे उल्लंघन केले आहे. तसेच इतर देशांकडून डेटा चोरी करण्यास सांगितले नाही.' जर चिनी सरकारने असे म्हटले नसेल तर ओकेआयडीबी डेटा चिनी सरकारने का वापरला असेल  असे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you are ordering online from Zomato Flipkart, China is keeping an eye on you