लस आली तरी मास्क हवाच!

वृत्तसंस्था
Thursday, 30 July 2020

लशींची मानवी चाचणी सुरू झाली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोनावर लस आली तरी रोजच्या जीवनात स्वसुरक्षेसाठी मास्क आणि तोंड झाकण्यासाठी अन्य साधनांपासून मुक्ती मिळणार नाही..

न्यूयॉर्क - कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी जगभरात ११५ लशींवर संशोधन सुरू असून त्यापैकी २६ लशींची मानवी चाचणी सुरू झाली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोनावर लस आली तरी रोजच्या जीवनात स्वसुरक्षेसाठी मास्क आणि तोंड झाकण्यासाठी अन्य साधनांपासून मुक्ती मिळणार नाही.

मास्कची आवश्‍यकता
१)कोरोना विषाणूंविरोधात लढ्यात रोग प्रतिकारक्षमतेत वाढ करणारी प्रभावी लस तयार होण्याची शक्यता कमी.
कोरोना रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची आणि लक्षणे तयार होण्याची शक्यता लशीमुळे कमी होईल, पण कोरोनापासून संपूर्ण सुरक्षा मिळण्याची हमी नाही. 
सामूहिक संसर्ग रोखण्याची शक्यताही कमी
कोरोनाच्या संसर्ग होऊ नये यासाठी लशीची उपयुक्तता ६० ते ७० टक्केच

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

२)लस हा जादुई उपाय नव्हे (‘सायन्स इनसायडर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात ‘बेलोर कॉलेज ऑफ मेडिसिन’मधील लस संशोधक मारिया एलेना बोटाझी यांचे भाष्य)
लस मिळाली याचा अर्थ असा नव्हे की मास्क कचरा पेटीत टाकून द्यायचा. 
लस हा कोरोनावरील जादुई उपाय आहे, असे कोणी समजू नये. 
लशीसह अन्य पर्यायांची गरज भासणारच आहे.
कोरोनाच्या प्रतिबंध लस प्रभावी असली तरी या सर्व प्रक्रिया दीर्घकालीन आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३)तात्‍पर्य
 लस उपलब्ध झाली तरी साथीपूर्वीचे जीवन जगता येऊ शकणार नाही.
लशीनंतरही सुरक्षित अंतर, आरोग्याची काळजी घेणे, आणि संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक
कोरोनावर ६० टक्के प्रभावी ठरणाऱ्या लसीपेक्षा लस नसणे अधिक चांगले.
यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
कोरोनात्तोर काळातही सुरक्षेसाठी मास्क लावणे उत्तम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if you get vaccinated you need a mask for self-protection in your daily life