भन्नाट! कितीही झूम करा.. फोटो 'फाटणारच' नाही!!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड शक्तीच्या कॅमेराने चिनमधील शांघाय शहराचा हा फोटो काढला आहे. तो फोटो इतका स्पष्ट आहे की, त्या फोटोतील प्रत्येक वस्तू कितीही झूम करून पाहिली तरीही प्रतिमा ब्लर होत नाही.

शांघाय- क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड शक्तीच्या कॅमेराने चिनमधील शांघाय शहराचा हा फोटो काढला आहे. तो फोटो इतका स्पष्ट आहे की, 
त्या फोटोतील प्रत्येक वस्तू कितीही झूम करून पाहिली तरीही प्रतिमा ब्लर होत नाही.

या कॅमेऱ्याची कमाल म्हणजे रस्त्यावरच्या वाहनाच्या नंबर प्लेट सुद्धा आपण स्पष्ट वाचू शकतो. तुम्ही फोटोला 360 अंशातून फिरवून पाहू शकता. झूम इन किंवा झूम आउट च्या सहाय्याने फोटो झूम करून आपण रस्त्यावरील प्रत्येक गोष्ट बारकाईने यामध्ये पाहू शकतो. चीनच्या मिलिटरी सायन्स अँड टेकनोलॉजी मधील ही एक क्रांती असेच म्हणावे लागेल.

या फोटोची नेमकी काय कमाल आहे ते तुम्हीही पाहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Image Is Made Up Of 24.9 BILLION Pixels And You Can Even Zoom In On The Pedestrians’ Faces

टॅग्स