युक्रेन युद्ध काळातही रशियातून भारतात चौपट आयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

goods import
युक्रेन युद्ध काळातही रशियातून भारतात चौपट आयात

युक्रेन युद्ध काळातही रशियातून भारतात चौपट आयात

मुंबई - रशिया-युक्रेन युद्धस्थितीदरम्यान रशियातून भारतात होणारी आयात मात्र चार पटीने वाढली आहे. एप्रिल ते मे २०२२ दरम्यान ही आयात तब्बल ५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. भूराजकीय परिस्थिती पाहता इंधनाचा भडका उडाल्याने रशियातून कच्च्या तेलाची मागणी या महिन्यात अधिक झाली.

व्यापार क्षेत्रात रशिया भारताचा मोठा भागीदार आहे. अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले होते. यानंतर रशियातून होणारी आयात साडे तीन पटीने वाढून जवळपास ८.६ अब्ज डॉलर पार गेली होती; तर २०२१ मध्ये याच कालावधीत ही आयात २.५ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. एप्रिल - मे २०२२ दरम्यान ही आयात चार पट वाढून ५ अब्ज डॉलरवर पोहोचली.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रशियातून होणाऱ्या आयातीमध्ये पेट्रोलियम पदार्थांशिवाय अन्य काही उत्पादने जसे की कीटकनाशके आणि खाद्य तेल यांच्या आयातीत उल्लेखनीय वाढ झाली; तर देशात कोळशाचा तुटवडा झाल्याने रशियातून मोठ्या प्रमाणात कोकिंग कोल आणि स्टीम कोल आयात करावा लागला होता.

व्यापारी तूट ४.८ अब्ज डॉलरपार

किमती रत्न, हिरे यांच्या आयातीत मात्र घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे; परंतु अन्य वस्तूंची आयात मात्र वाढली. असे असले तरी भारतातून रशियाला होणारी निर्यात मात्र घटल्याचे पाहायला मिळाले. २०२२-२३ च्या पहिल्या दोन महिन्यांत व्यापार तूट वाढून ४.८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ही व्यापारी तूट ९०० मिलियन डॉलर होती.

मिनरल इंधनाची आयात वाढली

एप्रिल आणि मे २०२२ दरम्यान मिनरल इंधनाची आयात सहा पट वाढून ४.२ अब्ज डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यात कच्चा तेलाचे मूल्य जवळपास ३.२ अब्ज डॉलर होते. फेब्रुवारीमध्ये मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातून मिनरल तेलाची आयात दर महिन्याला वाढल्याचे पाहायला मिळाले. फेब्रुवारी ते मे २०२२ दरम्यान या पदार्थांचे मूल्य ५.३ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. जे मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ५ पट अधिक आहे.

Web Title: Imports From Russia To India Quadrupled Even During Ukraine War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaWarRussiaUkraine