Imran Khan : कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी दिला राजीनामा; मोठा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

Imran Khan : कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी दिला राजीनामा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांचे कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी राजीनामा (Cabinet Minister Shahjahan Bugti resigns) दिला आहे. ते बलुचिस्तानच्या जमुरी वतन पक्षाचे नेते आहे. ते इम्रान खान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. जमुरी वतन पार्टी इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या युती सरकारमध्ये सहयोगी होती.

पाकिस्तानच्या संसदेत सोमवारी (ता, २८) इम्रान खान यांच्याविरोधात ठराव मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव शुक्रवारीच मांडण्यात येणार होता. मात्र, सभागृह तहकूब झाल्याने सोमवारी तो मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे शाहजहान बुगतीने इम्रान खानची (Imran Khan) साथ सोडली आहे, तर दुसरीकडे इम्रान खानला विरोध करणाऱ्या पाकिस्तानी लोकशाही चळवळीत सामील झाला आहे.

हेही वाचा: शांघाय शहर बनले ‘हॉटस्पॉट’; चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप

शाहजान बुगती हा बलुचिस्तान चळवळीचा प्रमुख नेता अकबर बुगतीचा नातू आहे. बलुचिस्तान चळवळीमुळे २००६ मध्ये पाकिस्तानी लष्कराने अकबर बुगतीची हत्या केली होती. इम्रान खान (Imran Khan) इस्लामाबादमध्ये मोठी सभा घेणार असताना शाहजहान बुगती यांनी मंत्रिमंडळ सोडले आहे. या रॅलीकडे इम्रान खानचे शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.

आर्थिक संकट, बेरोजगारीने घेरले

पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ सदस्य आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवायचे असेल तर १७२ खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्याकडे केवळ १५० खासदार असल्याचा विरोधकांचा दावा आहे. एकीकडे विरोधकांकडून इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे इम्रान खान समर्थकांना संसदेचा घेराव करण्यास सांगत आहेत. इम्रान खान यांनी २०१८ मध्ये नवा पाकिस्तान निर्माण करण्याचा दावा करीत सत्ता हस्तगत केली. मात्र, इम्रान खान यांना आर्थिक संकट आणि बेरोजगारीने घेरले आहे.

टॅग्स :Pakistanimran khan