'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बावळट'

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

- इम्रान खान हे देशाला निराश करत आहेत

- पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी केले हे वक्तव्य.

-  त्यांचे

इस्लामाबाद : भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधी भूमिका घेत टीका केली जात आहे. भारताविरोधात वक्तव्ये केली जात असताना आता पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरच टीका केली. इम्रान खान बावळट आहेत, असे खार म्हणाल्या.

इम्रान खान यांच्या सरकारने पाकिस्तानची भूमिका जगभरातील इतर देशांना पटवून देण्यास यशस्वी ठरले नाहीत, अशी टीका पाकिस्तानच्या संसदेत करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानच्या विरोधी पक्ष नेत्या रब्बानी यांनी 'इम्रान खान हे देशाला निराश करत आहेत. तुम्ही बावळट असाल तर तुम्हाला प्रशिक्षण देण्याची आता गरज आहे. तुम्ही जाऊन प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे'.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, देशातील नागरिकांनी तुम्हाला मतदान करुन निवडले आहे. त्यामुळे त्यांची निराशा करु नका. लोकांनी तुमचा मान ठेवावा असे तुम्हाला वाटत नाही का? तुमचे काम तुम्हाला ठाऊक नाही का? असा सवालही रब्बानी यांनी इम्रान यांना केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan has made Pakistan a laughing stock says Paks former FM Hina Khar