esakal | शांतता प्रमुखांना इम्रान यांचे आमंत्रण; अफगाण शांततेला चालना देण्याचा हेतू
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

डॉ. अब्दुल्लाह यांनी आमंत्रणाबद्दल इम्रान यांचे आभार मानले. नजिकच्या भविष्यात पाकिस्तानला भेट देऊ असे ट्वीट त्यांनी केले. तालिबानने एक हजार अफगाण सुरक्षा जवानांना डांबून ठेवले आहे.

शांतता प्रमुखांना इम्रान यांचे आमंत्रण; अफगाण शांततेला चालना देण्याचा हेतू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेचे प्रमुख डॉ. अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

डॉ. अब्दुल्लाह हे अफगाण राष्ट्रीय फेररचना उच्च मंडळाचे अध्यक्ष आहेत. शांतता प्रक्रिया लवकरात लवकर पुढे न्यावी आणि उभय देशांत आणखी घनिष्ठ संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून वैचारिक देवाणघेवाण करण्याचा इम्रान यांचा उद्देश आहे.

सर्वसमावेशक राजकीय तोडगा काढण्याच्या ऐतिहासिक संधीचा अफगाणिस्तानच्या नेत्यांनी फायदा उठवावा असे आवाहन इम्रान यांनी केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. अब्दुल्लाह यांनी आमंत्रणाबद्दल इम्रान यांचे आभार मानले. नजिकच्या भविष्यात पाकिस्तानला भेट देऊ असे ट्वीट त्यांनी केले. तालिबानने एक हजार अफगाण सुरक्षा जवानांना डांबून ठेवले आहे. त्यांची सुटका करण्याच्या बदल्यात पाच हजार तालिबानी दहशतवाद्यांना सोडण्यास अफगाण सरकार राजी झाले आहे. फेब्रुवारीत अमेरिका आणि तालिबान यांच्यात तसा करार झाला आहे

अफगाण सरकार मात्र उरलेल्या 320 तालिबानी कैद्यांना सोडण्यास तयार नाही. तालिबानने त्यांच्या ताब्यातील आणखी 22 कमांडोंची सुटका करावी अशी सरकारची मागणी आहे. वास्तविक कैद्याच्या सुटकेला विधीमंडळाने (लोया जिग्रा) मंजुरी दिली असून त्यानंतर अध्यक्षांनीही अध्यादेश काढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शांतता प्रक्रियेत प्रगती 
व्हावी म्हणून या कैद्यांची सुटका करण्यास डॉ. अब्दुल्लाह यांचा पाठिंबा आहे. कैदी आणि जवान यांची देवाणघेवाण प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी आणि देशाचे क्लेश संपुष्टात आणण्यासाठी शांतता प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे ट्वीट त्यांनी नुकतेच केले आहे.

बैठकीनंतरची घडामोड
मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि तालीबानचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली. तालिबानच्या कतारस्थित राजकीय कार्यालयाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले. शांतता चर्चेत सहभागी झालेला उपप्रमुख मुल्लाह बरादर याच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले होते. शांततेचे विरोधक कारवाया करीत असले तरी चर्चेत प्रगतीची आपल्याला आशा असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा