Imran Khan Latest News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ; भेटायला गेलेल्या बहिणींना झाली मारहाण!

Rumors of assassination of former Pakistani Prime Minister Imran Khan : अफगाणिस्तानच्या मीडियाने केलाय दावा; तुरुंगाबाहेर इमरान खान यांच्या समर्थकांची मोठी गर्दी
former Prime Minister Imran Khan

former Prime Minister Imran Khan

sakal
Updated on

Latest updates abput Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या झाली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  मागील दोन वर्षांपासून इमरान खान हे रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद आहेत, परंतु सध्या त्यांच्या हत्येच्या अफवा पाकिस्तानात वेगाने पसरत आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारकडून तुरुंगात इमरान खान यांच्यावर अत्याचार झाल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. मात्र त्यांच्यी खरंच हत्या झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

परंतु,  कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही, ज्यामुळे अफवाना पेव फुटले आहे. तर प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री इमरान खान यांच्या बहिणी, नूरीन खान, अलिमा खान आणि उज्मा खान यांना तुरुंगातून बाहेर खेचून मारहाण करण्यात आली.

इमरान खान यांचा पक्ष असणाऱ्या पीटीआयचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत इमरान खान यांना भेटण्याची मागणी करत आहेत. तर पाकिस्तान सरकार मात्र इमरान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगत आहे.

former Prime Minister Imran Khan
Pune Police Action against Koyta Gang Video : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची जिरवली मस्ती; नागरिकांसमोरच बेदम चोपलं!

विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या माध्यमांनी असा दावा केलाय की, माजी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांची रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात हत्या करण्यात आली आहे. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. इमरान खान यांचे समर्थक अशी मागणी करत आहेत की जर इमरान खान सुरक्षित आणि जिवंत आहेत, तर मग त्यांना भेटण्याची परवानगी का दिली जात नाही? याचबरोबर पाकिस्तानमधील लोक सोशल मीडियावरही शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरुद्धही आपला राग व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com