
Imran Khan यांच्या अडचणीत वाढ; माजी पंतप्रधानांना होणार अटक? वॉरंट जारी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) नेते इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.
आता पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं (Pakistan Election Commission ECP) मंगळवारी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचे सदस्य फवाद चौधरी आणि असद उमर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाचा आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केलंय.
हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी ऑगस्ट 2022 मध्ये इस्लामाबादमध्ये एका रॅलीदरम्यान महिला न्यायाधीशाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
याशिवाय त्यांनी रॅलीत उच्च पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि त्यांच्या राजकीय विरोधकांवरही भाष्य केलं. त्याचवेळी, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्यावरही वादग्रस्त टिप्पणी केली होती.
हेही वाचा: Italy : पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डिनल जॉर्ज पेल यांचं निधन; लैंगिक अत्याचारप्रकरणी ठरले होती दोषी
भाषणानंतर काही तासांनी इम्रान खान यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत पोलीस आणि न्यायव्यवस्थेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
आता निसार दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखालील ECP च्या चार सदस्यीय खंडपीठानं खान आणि त्यांचे जवळचे सहकारी फवाद चौधरी आणि असद उमर यांच्या विरोधात वॉरंट जारी केलंय. वॉरंटशिवाय प्रत्येक व्यक्तीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.