
इस्लामाबाद : अल कादीर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पदाचा गैरवापर करत बेहिशेबी मालमत्ता गोळा करण्याच्या या प्रकरणात १९ कोटी पौंडांचा (५० अब्ज पाकिस्तानी रुपये) गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.