इम्रान खान यांची 'यूएन'च्या सभेत उपस्थिती नसणार

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत उपस्थित राहणार नाही, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली. इम्रान खान हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष देणार आहेत, असेही ते म्हणाले.

कुरेशी म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाची 73 वी सर्वसाधारण बैठक 18 सप्टेंबरला सुरु होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान खान उपस्थित राहणार नाहीत. मात्र, पाकिस्तानच्या वतीने मी पाकिस्ताच्या मंत्रिमंडळाचे प्रतिनिधित्व करणार आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार की नाही, याबाबत वादविवाद सुरु आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे.  

दरम्यान, इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतला असून, सध्या ते पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan will not have a presence at the UNs meeting