esakal | जानेवारीपूर्वी इम्रान घरी जातील - मरीयम नवाझ
sakal

बोलून बातमी शोधा

maryam-nawaz

सरकार हा शब्द लागू होण्याच्या योग्यतेचे ते नाही. विरोधकांची आघाडी काळाची गरज होती. सत्तेवर असलेल्यांच्या अन्यायाविरुद्ध जनतेने दडपण आणले आहे. त्यातून ही आघाडी निर्माण झाली.

जानेवारीपूर्वी इम्रान घरी जातील - मरीयम नवाझ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद - इम्रान खान यांचे सरकार तत्वतः घटनात्मक नाही तसेच त्यास कोणताही कायदेशीर आधार नाही. जानेवारीपूर्वी इम्रान घरी गेलेले असतील, असा दावा पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाच्या उपाध्यक्ष मरीयम नवाझ यांनी केला.

मरीयम या माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आहेत. इम्रान यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या विरोधकांमध्ये त्यांचाही सहभाग आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंटतर्फे (पीडीएम) 16 तारखेला पहिली सभा होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पार्श्वभूमीवर मरीयम म्हणाल्या की, जनरल परवेझ मुशर्रफ हे सत्तेवर होते तेव्हा सुद्धा आमच्या पक्षाचा इतका छळ झाला नव्हता. मी या सरकारला मान्यताच देत नाही. सरकार हा शब्द लागू होण्याच्या योग्यतेचे ते नाही. विरोधकांची आघाडी काळाची गरज होती. सत्तेवर असलेल्यांच्या अन्यायाविरुद्ध जनतेने दडपण आणले आहे. त्यातून ही आघाडी निर्माण झाली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पक्षात कोणतीही फूट नाही. पक्षाध्यक्ष शाहबाझ शरीफ हे मला वडीलांसारखे आहेत. त्यांचा दृष्टिकोन वेगळा राहिला आहे. संपूर्ण पक्ष नवाझ शरीफ यांच्या पाठीशी आहे. शरीफ बंधूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेले नेहमीच अपयशी ठरले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवाझ शरीफ वैद्यकीय उपचारांसाठी लंडनमध्ये गेले आहेत. ते केव्हा परततील, या प्रश्नावर मरीयम यांनी स्पष्ट केले की, डॉक्टरांनी परवानगी देताच ते येतील.

इम्रान हे निवडक व्यक्ती आहेत. त्यांना जनतेची फिकीर नाही. अशी व्यक्ती स्वतःच्याच हिताचा विचार करते. विरोधकांना नेहमी गप्प करण्याचेच त्यांचे धोरण असते.
- मरीयम नवाझ