श्रीलंकेत पेट्रोल एकाच दिवसात 75 रुपयांनी महागलं

श्रीलंकेत पेट्रोलचे दर तब्बल 254 रुपये प्रति लीटर पर्यंत पोहोचला आहे.
पेट्रोल
पेट्रोलsakal

रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) भारत पेट्रोल डिझेल दरवाढीच्या उंबरठ्यावर असतानाच शेजारच्या चिनी कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या श्रीलंकेमध्ये पेट्रोलच्या दरात तब्बल 75 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीसह श्रीलंकेत पेट्रोलचे दर तब्बल 254 रुपये प्रति लीटर पर्यंत पोहोचला आहे. तर डिझेलमध्येही 50 रुपयांची वाढ झाली असून डिझेलही आता 214 रुपये प्रति लीटर वर पोहोचलं आहे. (In Sri Lanka, petrol has gone up by Rs 75 in a single day; India on the brink of inflation)

पेट्रोल
Petrol-Diesel Price: निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर

चिनी साईडइफेक्ट आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम-

गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेमध्ये विकासाच्या नावाखाली चीनने (China) प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली. चीनने श्रीलंकेमधील विविध प्रकल्पांत पैसे गुंतवले आहेत. या कर्जाखाली दबलेल्या श्रीलंकेची स्थिती डबघाईला आली आहे. श्रीलंकेच्या रुपयांचं प्रचंड प्रमाणात अवमुल्यन झालं असून अर्थव्यवस्थेचतं कंबरडं मोडलं असून महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल डिझेलचे दरही गगनाला भिडले असून कालच्या एका दिवसात पेट्रोलमध्ये 70 रपयांची तर डिझेलमध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे. यासह पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 254 व 214 वर पोहोचला आहे.

पेट्रोल
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

चिनी साईडइफेक्ट आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम-

गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेमध्ये विकासाच्या नावाखाली चीनने प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली. चीनने श्रीलंकेमधील विविध प्रकल्पांत पैसे गुंतवले आहेत. या कर्जाखाली दबलेल्या श्रीलंकेची स्थिती डबघाईला आली आहे. श्रीलंकेच्या रुपयांचं प्रचंड प्रमाणात अवमुल्यन झालं असून अर्थव्यवस्थेचतं कंबरडं मोडलं असून महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल डिझेलचे दरही गगनाला भिडले असून कालच्या एका दिवसात पेट्रोलमध्ये 70 रपयांची तर डिझेलमध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे. यासह पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 254 व 214 वर पोहोचला आहे.

भारतही दरवाढीच्या उंबरठ्यावर?-

दरम्यान युक्रेन-रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातही पेट्रोल दरामध्ये 10- 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com