संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Displaced

संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत वाढ

sakal_logo
By
पीटीआय

जीनिव्हा - संघर्ष (Disturbance) आणि नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) या कारणांमुळे देशांतर्गत विस्थापनाचे (Displaced) प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचे एका सर्वेक्षणात (Survey) आढळून आले आहे. गेल्या दशकभरातील विस्थापित होण्याचे हे सर्वांधिक प्रमाण असल्याचे दिसून आले आहे. (Increase in the number of people displaced by conflict and disasters)

‘द इंटर्नल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटर’ने सर्वेक्षण करून आपला अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या अखेरीपर्यंत जगभरात साडे पाच कोटी लोक त्यांच्या देशातच बेघर होऊन इतरत्र राहत होते. वादळे, पूर या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दोन गटांमधील किंवा देशांमधील संघर्षही या वाढत्या विस्थापनाला कारणीभूत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. अनेक वेळा लोकांना दोन किंवा अधिक वेळा विस्थापित व्हावे लागले आहे. देशांतर्गत विस्थापित झालेल्यांची संख्या, आपला देश सोडून इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून राहणाऱ्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा: जागतिक नेत्यांमध्ये पडले 90 टक्के; तरीही मोदींचा रिझल्ट फेल

गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे माहिती गोळा करण्यात अनेक अडचणी आल्याने, विस्थापितांची संख्या नोंदली गेली, त्यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे.

म्यानमारमधून भारतात स्थलांतर

म्यानमारमधील लष्करी बंडानंतर या देशातून जवळपास चार ते सहा हजार नागरिक भारतात पळून आले असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी काढला आहे. याशिवाय, म्यानमारमध्ये संघर्षामुळे ६०,७०० जण विस्थापित झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत जवळपास सतराशे जणांनी थायलंडमध्ये आश्रय घेतला असल्याचेही संयुक्त राष्ट्रांनी सांगितले. म्यानमारच्या शेजारी देशांनी स्थलांतरीतांना आश्रय द्यावा आणि सुरक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. म्यानमारमध्ये संघर्ष समाप्त होण्याची चिन्हे नसल्याने विस्थापित आणि स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

loading image
go to top