
तरुणांचा देश असलेला भारत ३० वर्षांत होईल म्हातारा!
शतकाच्या अखेरीस लोकसंख्या ४७ कोटींनी कमी होईल. जगामध्ये सरासरी प्रजनन दर कमी होत असल्याने २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या घटू शकेल. तरुणांचा देश असलेला भारत तोपर्यंत म्हातारा (grow old) होऊ लागेल. जगातील बहुतेक देशांमध्ये २०३५ पासून लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यास सुरुवात होईल. बहुतेक देशांमध्ये प्रजनन दर प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. (India, a country of youth, will grow old in 30 years)
भारताबद्दल (India) बोलायचे झाले तर २०५० पर्यंत भारतातील लोकसंख्येतील वृद्धांची संख्या वाढेल आणि शतकाच्या अखेरीस लोकसंख्या कमी होईल. अतुल ठाकूर यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’साठी यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्सचे सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यावरून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: माहेरी आलेल्या मुलीला बसला धक्का; पाच जणांचे मृतदेह दिसले लटकलेले
युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार ३० वर्षांत म्हणजे २०५४ सालाच्या आसपास जगाची लोकसंख्या शिखरावर पोहोचेल. त्यावेळी जगाची लोकसंख्या ८.९ अब्ज होईल. अनेक तज्ञांचा असा ही विश्वास आहे की, लोकसंख्येचे शिखर २०५४ पूर्वी देखील येऊ शकते. मग शतकाच्या उत्तरार्धात जगाची लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल.
भारत अजूनही तरुण
भारत (India) हा तरुण देश आहे. एकूण लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या ४० पेक्षा कमी आहे. देशात २०२० मध्ये १० ते १४ वयोगटातील लोकांची सर्वाधिक संख्या होती. २०५० पर्यंत भारतातील लोकसंख्याही वृद्ध (grow old) होऊ लागेल. लोकसंख्येमध्ये ४० वर्षांवरील लोकांची संख्या सर्वाधिक असेल. तोपर्यंत ४० ते ४४ वयोगट भारतात सर्वाधिक असेल. चालू शतकाच्या अखेरीस भारताची एकूण लोकसंख्या आजच्या तुलनेत सुमारे एक तृतीयांश कमी होईल. त्यावेळी देशात सर्वाधिक संख्या ६० ते ६४ वयोगटातील लोकांची असेल. शतकाच्या अखेरीस देशाची लोकसंख्या ३४ टक्के कमी होईल असा अंदाज काढला जात आहे.
लोकसंख्येमध्ये प्रचंड घट होईल
चालू शतकाच्या अखेरीस भारत, चीन आणि जपानसारख्या देशांच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड घट होईल. जपानची लोकसंख्या जवळपास ६० टक्क्यांनी कमी झालेली असेल. सोबत चीनची लोकसंख्याही ५० टक्के पेक्षा जास्त कमी होईल. भारताबद्दल बोलायचे झाले तर २१०० पर्यंत देशाची लोकसंख्या ३४ टक्क्यांनी कमी होईल.
हेही वाचा: कोरोना : महाराष्ट्रात पुन्हा भीतीदायक आकडेवारी; सर्वाधिक रुग्ण मुंबईत
लोक जास्त काळ जगतील
UNच्या मते, २०२० मध्ये भारताची लोकसंख्या १३८ कोटी होती. जी २१०० मध्ये घटून ९१ कोटी होईल. या शतकाच्या अखेरीस भारताची लोकसंख्या आजच्या तुलनेत ४७ कोटींनी कमी होईल. लोकसंख्या कमी होईल पण लोकांचे वय वाढेल. शतकाच्या अखेरीस जगाची लोकसंख्या आजच्या तुलनेत कमी असेल; परंतु, लोक जास्त काळ आयुष्य जगतील. २१०० पर्यंत आयुर्मान ८० वर्षांपेक्षा जास्त होईल. सध्या जागतिक आयुर्मान ७३ वर्षे आहे. जे २१०० पर्यंत ८१.७ वर्षे वाढेल. याचा अर्थ असा आहे की शतकाच्या अखेरीस लोक सेवानिवृत्तीनंतर आणखी २० वर्षे जगतील. यामुळे लोकांना दीर्घकाळ काम करता यावे म्हणून सरकार निवृत्तीचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त वाढवू शकतात.
अनेक देशांची लोकसंख्या वाढेल
पाकिस्तान, टांझानिया, नायजेरिया सोबत अनेक देशांची लोकसंख्या वाढेल. शतकाच्या अखेरीस जगातील प्रत्येक देशाची लोकसंख्या कमी होईलच असे नाही. असे अनेक देश असतील ज्यांची लोकसंख्या वाढेल. टांझानियाची लोकसंख्या आजच्या तुलनेत अडीच पट असेल. सध्या त्यांची लोकसंख्या ६ कोटी असली तरी २१०० पर्यंत लोकसंख्या २०५ कोटी होईल. २१०० पर्यंत, काँगोची लोकसंख्या आजच्या तुलनेत जवळपास दुप्पट होईल. पाकिस्तानची लोकसंख्याही २२० दशलक्ष वरून २६० दशलक्ष होईल. नायजेरियाची लोकसंख्या २०२१ पर्यंत २१० दशलक्ष वरून ५३ दशलक्ष होईल.
Web Title: India A Country Of Youth Will Grow Old In 30 Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..