India Canada Relations : उच्चायुक्त नियुक्तीला दोन्ही देश सहमत
G7Summit 2025 : जी-७ परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत लवकरच उच्चायुक्त नियुक्त करण्यावर सहमती दर्शवली आहे.
कनानस्किस (कॅनडा) : ‘‘भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत लवकरच उच्चायुक्त पुन्हा नियुक्त करण्याबाबत सहमती दर्शवली आहे,’’ असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.