esakal | हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा आराखडा देण्यास भारत, चीनला अपयश
sakal

बोलून बातमी शोधा

UNFCCC

हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा आराखडा देण्यास भारत, चीनला अपयश

sakal_logo
By
पीटीआय

बर्लिन - संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) दिलेल्या मुदतीत हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा सुधारित आराखडा (Plan) सादर करण्यात भारत (India) आणि चीनला (Chin) अपयश (Unsuccess) आले आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण परिषदेच्या अहवालात सर्व देशांनी स्वत:साठी निर्धारित केलेल्या उद्दीष्टांचा समावेश करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा आराखडा मागविला होता. (India and China Fails Give Plan to Reduce Greenhouse Gas Emissions)

तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांनी सुधारित उद्दीष्ट्ये निश्‍चित करून त्याबाबतचा आराखडा ३१ जुलैपर्यंत सादर करावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्रांनी सर्व देशांना केली होती. मात्र, भारत आणि चीनसह अनेक देशांना ही वेळ पाळता आलेली नाही. सर्वाधिक प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत चीन प्रथम क्रमांकावर असून अमेरिका दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने त्यांचा सुधारित आराखडा एप्रिलमध्येच सादर केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ११० सदस्य देशांनी त्यांची नवी उद्दीष्ट्ये सादर केली असली तरी अद्याप ४२ टक्के देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख पॅट्रिशिया एस्पिनोसा यांनी व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यात जागतिक पर्यावरण परिषद होणार आहे.

हेही वाचा: लस घेतलेल्यांना पिझ्झा खरेदीत सवलत; ब्रिटनमध्ये भन्नाट योजना

जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखण्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी पुरेसे प्रयत्न करण्यात बहुतेक देशांना अपयश आलेले आहे. त्यामुळे अधिक महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात अर्थ नाही. यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्‍यक आहे हे गेल्या काही काळात आलेल्या उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर यावरून स्पष्ट होते.

- पॅट्रिशिया एस्पिनोसा, पर्यावरण विभाग प्रमुख (यूएन)

loading image
go to top